ठोंबळसांगवी येथील 15 वर्षांपासून मागणी असलेला रस्ता आ.आजबे यांच्या प्रयत्नाने मंजूर

 ठोंबळसांगवी येथील 15 वर्षांपासून मागणी असलेला रस्ता आ.आजबे यांच्या प्रयत्नाने मंजूर




 आष्टी प्रतिनिधी 


ठोंबळसांगवी येथील गेल्या वीस वर्षापासून ग्रामस्थांची मागणी असलेला काकडे वस्ती ते मांगोबा वस्ती रस्त्या आमदार बाळासाहेब आजबे यांच्या प्रयत्नातून मंजुर करण्यात आला असून या रस्त्याचा शुभारंभ गावातील ज्येष्ठ नागरिकांच्या उपस्थितीमध्ये मंगळवार दिनांक 2 ऑगस्ट रोजी सकाळी दहा वाजता करण्यात करण्यात आला.

 या भागातील नागरिकांची अनेक दिवसांची या रस्त्याची मागणी होती,काही दिवसांपूर्वी या वस्तीवरील नागरिक व महिला आमदार बाळासाहेब आजबे यांना भेटून रस्ता मंजूर करावा अशी मागणी केली होती त्यानंतर अवघ्या चार ते पाच महिन्यांमध्ये आमदार बाळासाहेब आजबे काका यांनी हा रस्ता मंजूर करून या भागातील जनतेची होणारी गैरसोय दूर केली आहे . या रस्त्यासाठी आ, बाळासाहेब आजबे काका यांच्याकडे  राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे ज्येष्ठ नेते चंद्रगुप्त खलासे यांनी पाठपुरावा केला, आमदार बाळासाहेब आजबे काका यांनी या रस्त्याचा प्रश्न मार्गी लावला आहे  दिलेला शब्द काकांनी पूर्ण केला असल्याने गावातील लोकांनी आमदार बाळासाहेब काका आजबे यांचे आभार मानले विशेष म्हणजे हा रस्त्याचा शुभारंभ करतेवेळी काकडे वस्ती व मांगो बा वस्तीवरील महिला व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते आमदार बाळासाहेब आजबे काका यांच्या माध्यमातून तालुक्यातील अनेक वस्ती रस्त्यांचा प्रश्न मार्गी लागल्याने शेतकरी व सर्वसामान्य जनतेमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे यावेळी विजय गायकवाड, चंद्रगुप्त खलासे,चक्रधर चौधरी, नुरुद्दीन शेख, बाळासाहेब लाळगे, शिवाजी सूर्यवंशी राजाभाऊ सायंबर,भैय्या लोखंडे, देविदास चौधरी, महादेव चौधरी, सुनील चौधरी, नवनाथ चौधरी, अर्जुन चौधरी, केशव शिंदे, गणेश चौधरी, विष्णू चौधरी, बाळू शिंदे, अशोक लाळगे शिंदे,बोरकर सर,शाहीर दिलीप शिंदे, पिनू शेलार, साके बाबा, यांच्यासह महिला भगिनी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते,

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

फॉलोअर