तोफखाना पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यावर अँटी करप्शनचा ट्रॅप,
विनापरवाना दारू विक्री करण्याची परवानगी देऊन त्यांच्यावर कायदेशीर कारवाई न करण्याचा मोबदल्यात घेतले पैसे
आष्टी प्रतिनिधी- गोरख निकाळजे.
अहमदनगर तोफखाना पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यावर अँटी करप्शनचा ट्रॅप, विनापरवाना दारू विक्री करण्याची परवानगी देऊन त्यांच्यावर कायदेशीर कारवाई न करण्याच्या मोबदल्यात घेतले पैसे. या प्रकरणातील तक्रारदार यांना विनापरवाना दारू विक्री करण्याची परवानगी देऊन त्यांच्यावर कायदेशीर कारवाई न करण्याच्या मोबदल्यात आरोपी लोकसेवक पोलीस नाईक शैलेश गोमसाळे तोफखाना पोलीस स्टेशन यांनी आरोपी खाजगी व्यक्ती वैभव साळुंके यांच्या मार्फतीने दरमहा ३०,००० रू. हप्ता घेण्याचे मान्य करून आरोपी वैभव साळुंके याच्या मार्फत ३०,००० रू. लाचेची रक्कम आरोपी खाजगी वैभव साळुंखे यांनी स्वतः आरोपी लोकसेवक शैलेश गोमसाळे यांच्या वतीने सिटी स्टोअर पाईपलाईन रोड एकविरा चौक अहमदनगर येथे दि.०२/०८/२०२२ रोजी स्वीकारली असून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.सदरची कारवाई श्री.सुनील कडासने पोलीस अधीक्षक ला.प्र.वि.नाशिक परिक्षेत्र नाशिक,श्री.एन.एस.न्याहळदे अप्पर पोलीस अधीक्षक ला.प्र.वि.नाशिक परिक्षेत्र नाशिक,श्री.सतीश डी.भामरे वाचक पोलीस उपाधीक्षक ला.प्र.वि.नाशिक परिक्षेत्र नाशिक यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीमती साधना इंगळे पोलीस निरीक्षक अँटी करप्शन ब्युरो नाशिक,पोहवा/सचिन गोसावी,पोहवा/प्रफुल माळी,पोहवा/चंद्रशेखर मोरे,पोना/शरद हेंबाडे,पोहवा/संतोष गांगुर्डे यांनी केली आहे.

stay connected