*कर्जत : पुरस्कार- सन्मान उत्तम आणि आदर्श लोकाभिमुख कार्याची पावती - प्रांताधिकारी डॉ अजित थोरबोले*

*कर्जत : पुरस्कार- सन्मान उत्तम आणि आदर्श लोकाभिमुख कार्याची पावती - प्रांताधिकारी डॉ अजित थोरबोले*



कर्जत प्रतिनिधी : दि 3

      प्रशासन सेवा काळात अधिकारी आणि कर्मचारी यांनी शासनाने दिलेली जबाबदारी योग्य पार पाडली तर त्यासेवेत समाधान मिळते. आणि त्या सेवेच्या आधारेच तो अधिकारी-कर्मचारी पुरस्काराने सन्मानित होतो. तो सन्मान त्याच्या उत्तम आणि आदर्श कार्याची पावती असते असे प्रतिपादन प्रांताधिकारी डॉ अजित थोरबोले यांनी केले. ते कर्जत तहसील कार्यालयात महसूल अधिकारी-कर्मचारी गुणगौरव सोहळ्यानिम्मित बोलत होते.      याप्रसंगी कर्जत महसूल उपविभागातील अधिकारी, मंडळ अधिकारी, तलाठी, कोतवाल, वाहनचालक, मदतनीस आदींचा प्रशस्तीपत्रक देत सन्मान करण्यात आला. यासह सोमवारी जिल्हाधिकारी कार्यलयात कर्जतचे तहसीलदार नानासाहेब आगळे यांना "उत्कृष्ट तहसीलदार" आणि अव्वल कारकून किशोरी त्र्यंबके यांना "उत्कृष्ट कर्मचारी" पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल त्यांचा कर्जत महसूल उपविभाग आणि तालुका प्रशासनाकडून विशेष सन्मान करण्यात आला. यावेळी पोलीस उपअधीक्षक अण्णासाहेब जाधव, जामखेड तहसीलदार योगेश चंद्रे, कर्जत तहसीलदार नानासाहेब आगळे, गटविकास अधिकारी अमोल जाधव, नायब तहसीलदार सुरेश वाघचौरे, मनोज भोसेकर, शिरस्तेदार मच्छिंद्र पाडळे यांच्यासह कर्जत-जामखेड महसूल विभागातील महसूल अधिकारी- कर्मचारी आदी उपस्थित होते.       


(डॉ अफरोजखान पठाण - कर्जत प्रतिनिधी)

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

फॉलोअर