*मा.आ.भीमराव धोंडे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त भगवान महाविद्यालयात विविध कार्यक्रम*

 *मा.आ.भीमराव धोंडे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त भगवान महाविद्यालयात विविध कार्यक्रम*



शेख अजहर / प्रतिनिधी -

आष्टी येथील शेतकरी शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक अध्यक्ष माजी आमदार तथा शिक्षण महर्षी भीमराव धोंडे यांचा ५ ऑगस्ट रोजी वाढदिवस. यावर्षी वाढदिवसानिमित्त आष्टी येथील भगवान महाविद्यालयामध्ये दिनांक २ ते ५ ऑगस्ट या कालावधीमध्ये विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे,यामध्ये निबंध स्पर्धा, पोस्टर प्रेसेंटेशन स्पर्धा,सामान्य ज्ञान परीक्षा,रांगोळी स्पर्धा व रक्तदान शिबिर यांचा समावेश आहे.या सर्व स्पर्धा सर्व वयोगटासाठी खुल्या असून संबंधित तारखेला महाविद्यालयामध्ये दहा वाजता सुरू होतील या स्पर्धेची सुरुवात आज दिनांक २ ऑगस्ट रोजी होणार आहे,आज निबंध स्पर्धेने सुरुवात होत आहे तरी या स्पर्धेमध्ये सहभाग घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी प्रा.डॉ.आप्पासाहेब टाळके ९४२१५४३५९० व प्रा.आबासाहेब पोकळे ९७६३४३४५४६ या प्राध्यापकांशी संपर्क करावा.

दिनांक ३ ऑगस्ट रोजी संपन्न होणाऱ्या पोस्टर प्रेसेंटेशन साठी डॉ.दिगंबर पाटील ८२७५४९५१६१ आणि प्रा.श्रीकांत धोंडे ९४२०३९६४३५ तर सामान्य ज्ञान स्पर्धा परीक्षेसाठी प्रा.बन्सी वाळके ९४२१३४९०६५ प्राध्यापक विक्रम खेडकर ९७६३७५२७६४ यांच्याशी संपर्क करावा.

दिनांक ४ ऑगस्ट रोजी रांगोळी स्पर्धेसाठी प्रा.दादासाहेब सदाफुले ९८२३९३४८४७ आणि प्रा.श्रीरंग पवार ९४२००१९९८५ तर वाढदिवसाच्या दिवशी म्हणजे दिनांक ५ ऑगस्ट रोजी भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आलेले आहे यासाठी राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्रोफेसर अशोक देवकर ९४२१३३९५१५ आणि क्रीडा संचालक डॉ.दीपक टेकाडे ९५१८३६१६१७ यांच्याशी संपर्क करावा.या सर्व स्पर्धासाठी आकर्षक बक्षिसे ठेवण्यात आलेली आहे.अधिक माहितीसाठी संबंधित प्रभारी प्राध्यापकांशी संपर्क साधावा."आष्टी परिसरातील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी आपला सहभाग नोंदवून आपले कौशल्य सिद्ध करावे" असे आवाहन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.दत्तात्रय वाघ यांनी केले आहे.

मा.आ.भीमराव धोंडे यांच्या वाढदिवसानिमित्त कार्यक्रमाचे नियोजन प्राचार्य डॉ.दत्तात्रय वाघ,उपप्राचार्य डॉ.ज्ञानदेव वैद्य व पंडित जवाहरलाल नेहरू कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य दत्तात्रय रेडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व प्राध्यापक करत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

फॉलोअर