*नागबर्डी ता कंधार येथील यात्रेतील सर्व भाविक भक्तांना विक्रांत दादा शिंदे यांनी नागपंचमीच्या दिल्या शुभेच्छा* नांदेड प्रतिनीधी ( प्रदीप मगरे )

 *नागबर्डी ता कंधार येथील यात्रेतील सर्व भाविक भक्तांना विक्रांत दादा शिंदे यांनी नागपंचमीच्या दिल्या शुभेच्छा*





नांदेड प्रतिनीधी ( प्रदीप मगरे )

आज नागबर्डी ग्रा.पं.गुंडा ता.कंधार येथील नागपंचमीनिमित्त दरवर्षीप्रमाणे याही वर्षी मोठ्या प्रमाणात यात्रा भरण्यात आली तेथील सर्व भाविक भक्तांना नागपंचमीच्या शुभेच्छा देण्यासाठी आणि येणाऱ्या भक्तांसाठी विक्रांतदादा शिंदे मित्रमंडळातर्फे महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते याठिकाणी विक्रांत दादा शिंदे स्वतः उपस्थित राहून सर्वप्रथम महादेवाचे दर्शन घेऊन कार्यकर्त्यातर्फे अभिषेकाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी विक्रांतदादा शिंदे यांनी अभिषेक करून पंचक्रोशीतील सर्व भाविक भक्तांना नागपंचमीच्या शुभेच्छा देऊन सर्वांना महाप्रसाद लाभ घेण्याचे सांगितले विक्रांतदादा शिंदे मित्रमंडळ आयोजित भव्य दिव्य अशा पेंडॉलमध्ये सर्व भाविक भक्तांना महाप्रसादाची तसेच बसण्याची व्यवस्था आणि पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती यावेळी कंधार कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती अरुण पाटील कदम, माजी सरपंच राजू पाटील वडवळे, सरपंच आदिनाथ पाटील शिंदे, संतोष पाटील वडवळे,गंगाधर पाटील चिखलीकर, रणजीत पाटील डिंकळे,सरपंच हणमंत पाटील कदम,विशाल पाटील कौशल्य, दत्ता पाटील शिंदे,प्रताप पाटील शिंदे, रामकिसन पाटील शिंदे,ओंकार शिंदे,गंगाधर पाटील येलूरकर, दिगंबर पाटील इंगळे, आनंदा वाघमारे सह कार्यकर्ते,गावकरी, भाविक भक्त,महिला व विक्रांत दादा शिंदे मित्र मंडळाचे कार्यकर्ते  मोठ्या सकेने उपस्थित  होते ..

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

फॉलोअर