सूडबुद्धीने सुरू असलेल्या ईडीच्या कारवाईचा आष्टी तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या बैठकीत निषेध विकास कामाच्या जोरावर आगामी प.स व जि.प निवडणूका लढवणार-- आ.बाळासाहेब आजबे
आष्टी प्रतिनिधी
गेल्या अडीच वर्षाच्या काळात आष्टी पाटोदा शिरूर विधानसभा मतदारसंघांमध्ये महाविकास आघाडी सरकारच्या माध्यमातून आपण मोठ्या प्रमाणात विकास कामे केली आहेत कार्यकर्त्यांनी ही विकास कामे सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचण्याचे काम करावे आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष विकास कामाच्या जोरावर लढवणार असून कार्यकर्त्यांनी या निवडणुकांसाठी कामाला लागावे असे आवाहन करत सरकारच्या माध्यमातून सूटबुद्धीने ईडीचा गैर वापर करून नाहक त्रास देण्याच्या उद्देशाने कारवाई केल्या जात आहेत त्याचाही या बैठकीत जाहीर निषेध करण्यात आला .
आष्टी पाटोदा शिरूर मतदार संघाचे कर्तव्यदक्ष आमदार बाळासाहेब आजबे काका यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली शिराळ येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे ज्येष्ठ नेते बी एन चाचा मुटकुळे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. यावेळी माजी जि प अध्यक्ष डॉक्टर शिवाजी राऊत तालुकाध्यक्ष अण्णासाहेब चौधरी काकासाहेब शिंदे परमेश्वर काका शेळके हरिभाऊ दहातोंडे एडवोकेट पारखे सुनील नाथ शिवाजी नाकाडे यांच्या प्रमुख उपस्थितीत सोमवार दिनांक 01 ऑगस्ट रोजी घेण्यात आली यावेळी बोलताना आमदार आजबे म्हणाले की सत्ताधारी पार्टीच्या वतीने इ डी कार्यालयाचा गैरवापर करून सूडबुद्धीने कारवाया करण्यात येत आहेत या सर्व गोष्टीचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने निषेध करण्यात येत असल्याचे या बैठकीत त्यांनी सांगितले पुढे बोलताना ते म्हणाले की लवकरच जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका जाहीर होणार आहेत त्यामुळे आपण अडीच वर्षात मतदार संघात मोठ्या प्रमाणात कामे केली आहेत ती कामे सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचण्याचे काम कार्यकर्त्यांनी करावे सर्वसामान्य जनतेचा विरोधकांवर विश्वास राहिला नसून सर्वसामान्य जनता आजही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या बरोबर आहे त्यामुळे विकास कामाच्या व जनतेने दाखवलेला विश्वासाच्या जोरावरच आपण जिल्हा परिषद व पंचायत समितीमध्ये मोठ्या मोठे यश मिळवणार आहोत त्यासाठी कार्यकर्त्यांनी गाव पातळीवर कामाला लागले पाहिजे स्थानिक स्वराज्य संस्था ताब्यात असतील तरच मोठ्या प्रमाणावर विकास कामे खेचून आणता येतात आजपर्यंत कधी नाही एवढा निधी आपण मतदार संघात विकास कामासाठी आणला आहे त्यामुळे जनतेचा आपल्यावर विश्वास असून सर्वसामान्य जनतेचा विश्वासास तडा जाऊ जाणार नाही याची खबरदारी कार्यकर्त्यांनी घेतली पाहिजे येत्या काही दिवसात शिंदे व भाजप सरकार कोसळणार असल्याचे भाकीत यावेळी त्यांनी केले, आपण केलेल्या कामाची माहिती सर्वसामान्य जनतेपर्यंत गेली पाहिजे कार्यकर्त्यांना काहीही कमी पडून देणार नाही त्यासाठी मी खंबीर असल्याचेही आमदार बाळासाहेब आजबे कार्यकर्त्यांच्या बैठकीत यांनी सांगितले. या बैठकीसाठी मोठ्या संख्येने आष्टी तालुक्यातून कार्यकर्ते उपस्थित होते.



stay connected