*साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त: विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप*
*श्री आदर्श बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचा स्तुत्य उपक्रम*
केज /प्रतिनिधी
केज शहरांमध्ये विविध पाच ठिकाणी लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची जयंती विविध उपक्रमांनी मोठ्या हर्ष उल्हासत साजरी करण्यात आली.
हाउसिंग कॉलनी महात्मा फुले नगर येथे गेल्या तीन ते चार दिवसापासून रक्तदान शिबिर, निबंध स्पर्धा, रांगोळी स्पर्धा, खो खो स्पर्धा, हस्तक्षेर स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा आणि समाज प्रबोधन पर भीम गीते व शहर अण्णाभाऊ साठे यांची गीते आणि पोवाडे असे विविध कार्यक्रम घेण्यात आले.
दि.१ ऑगस्ट रोजी सकाळी छत्रपती शिवाजी महाराज, अण्णाभाऊ साठे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, लहुजी वस्ताद या सर्वच महामानवाच्या प्रतिमेचे धूप दिपानी आणि पुष्पहार घालून पूजन करून ध्वजारोहण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जनविकास परिवर्तन आघाडीचे प्रमुख हरून भाई इनामदार तर प्रमुख पाहुणे केज नगरीच्या नगराध्यक्ष सौ. सीता ताई बनसोड, नगरसेवक सुमित (बप्पा) शिंदे, श्री आदर्श बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष तात्या गवळी, पत्रकार दत्ता हंडीबाग यांची कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती होती.
तसेच लहान गटातील व मोठ्या गटातील विजेत्यांना आणि विद्यार्थ्यांना सन्मान चिन्ह आणि श्री आदर्श बहुउद्देश्य सेवाभावी संस्थेच्या वतीने शालेय साहित्य देऊन गौरविण्यात आले.
या वेळी नगराध्यक्षा सौ. सीता ताई बनसोड यांनी अण्णाभाऊ साठे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार मांडले. पुढे बोलताना शिताताई बनसोड विद्यार्थ्यांना म्हणाल्या शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा स्पर्धा परीक्षेची तयारी करून मोठमोठे अधिकारी, डॉक्टर आणि इंजिनिअर होऊन स्वतःचे अस्तित्व समाजात निर्माण करा.
अध्यक्षीय भाषणात भाई इनामदार यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. पुढे बोलताना हरून भाई इनामदार म्हणाले की, जनविकास परिवर्तन आघाडीच्या माध्यमातून युवकांना व महिलांना रोजगार उपलब्ध करून देणार. ज्या विद्यार्थ्यांना दहावी आणि बारावी च्या परीक्षेमध्ये ९०% गुण मिळाल्यात. अशा विद्यार्थ्यांना बंसल क्लास मध्ये ऍडमिशन देऊन त्या विद्यार्थ्यांची ५०% फिस जनविकास परिवर्तन आघाडीच्या माध्यमातून भरणार आहे.
केज शहरातील सर्व नागरिकांच्या अडीअडचणी सोडविण्याकरिता. जनविकास परिवर्तन आघाडी अहोरात्र तत्पर आहे. या कार्यक्रमास विकी लोखंडे, अनिल गालफाडे, रोहित कसबे, राजाभाऊ लांडगे, लक्ष्मण थोरात, सौ. आशाताई कसबे, प्रवीण लांडगे, विकी लांडगे, राहुल इनकर, अशोक धिवार, विवेक बनसोड, कुणाल पौळ, शरद थोरात, महेश शिंदे, अनिकेत गालफाडे, विजय लांडगे, कपिल लांडगे, विवेक लांडगे, कैलास पौळ, हर्षद जाधव, यश कसबे, रमेश लांडगे आणि जयंती उत्सव कमिटीचे सर्व सदस्य, राजकीय, सामाजिक क्षेत्रातील कार्यकर्ते आणि परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. अशोक गायकवाड यांनी सूत्रसंचालन केले. तर लहू जाधव यांनी सर्वांचे आभार मानले.


stay connected