लोकशाहीर, साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त पिंपरी घुमरि अण्णाभाऊंच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

 लोकशाहीर, साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त पिंपरी घुमरि अण्णाभाऊंच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.



     महाराष्ट्राच्या सामाजिक व राजकीय परिवर्तनाच्या चळवळीत अण्णाभाऊंनी दिलेले योगदान अद्वितीय आहे. मनात गहन गंभीर करुणा असल्याशिवाय विषमतेविरुद्ध खंबीर लढा देता येत नाही. क्रांतीच्या अंतरात करुणेची पाळेमुळे असल्याशिवाय ती यशस्वी होत नाही. अण्णाभाऊंनी समतेच्या क्रांतीची स्वप्ने पाहिली, त्यासाठी उपेक्षित वर्गाचे प्रतिनिधित्व करत त्यांनी सदैव विध्यार्थी, महिला, किसान आणि कामगारांच्या प्रश्नासाठी वेळोवेळी लढे दिले. 


      अण्णाभाऊंच्या अंतरीचा आत्यंतिक सेवाभाव आणि अथांग करुणा त्यांच्या साहित्यातून वेळोवेळी प्रकट होते. समाजजागृती करण्यासाठी तसेच उपेक्षित वर्गाचे प्रश्न मांडण्यासाठी त्यांनी शेकडो पुस्तके, अनेक कादंबऱ्या, नाटके, कविता लिहिल्या.  मराठी साहित्याला जे विश्व परिचित नव्हते, जी माणसे परिचित नव्हती. ज्या भावभावना आकांक्षा परिचित नव्हत्या. त्या उपेक्षित पीडित जगाचे, दर्शन आपल्या साहित्यातून समर्थपणे करून देण्याचे काम अण्णाभाऊंच्या साहित्याने केलं. आज अण्णाभाऊंच्या जयंतीनिमित्त त्यांच्या विचारांना आत्मसात करत वाटचाल करण्याचा प्रयत्न करूया. 

यावेळी युवक काँग्रेसचे विधानसभा अध्यक्ष जाधव प्रशांत, किशोर क्षीरसागर, विकास क्षीरसागर, प्रकाश क्षीरसागर, दीपक परकाळे ,मेहमूद शेख, अविनाश वारुळे, राजू वारुळे, हाणू क्षीरसागर, दत्ता क्षीरसागर, शाम क्षीरसागर,  सौरभ क्षीरसागर, प्रशांत क्षीरसागर,  उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

फॉलोअर