विश्वविख्यात शीळवादक डाॅ.मधुसूदन घाणेकर यांचा सत्कार !!!

 विश्वविख्यात शीळवादक डाॅ.मधुसूदन घाणेकर यांचा सत्कार !!!



पुणे: रंगयात्रा,पुणे आयोजित 

स्वर-किरण रंगमंच पुणे प्रस्तुत

पुण्यात नुकताच यशवंतराव चव्हाण नाटय़गृह येथे स्व.महंमद रफी यांच्या 42 व्या

स्मृतिदिनानिमित्त ' याद किया दिलसे' हा विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात विश्वविख्यात शीळवादक डाॅ.मधुसूदन घाणेकर यांनी स्व.महंमद रफी यांना शीळवादनातून विनम्र अभिवादन केले.उपस्थित रसिकांकडून डाॅ.घाणेकर यांच्या

शीळवादनास उत्स्फूर्त दाद मिळाली.

गुजरात येथील 

कामधेनू युनिव्हर्सिटी तसेच आनंद ॲग्रिकल्चर युनिव्हर्सिटीचे फाॅर्मर व्हाईस

चान्सलर, अध्यक्ष डाॅ.एम.सी.

वारष्णेय यांच्या शुभहस्ते डाॅ.मधुसूदन घाणेकर यांचा जाहिर सत्कार करण्यात आला.

याप्रसंगी मुख्य निमंत्रक-प्रसिद्ध 

गायक ॲड.पी.टी.जगदाळे , NGO आघाडी BJP पुणे अध्यक्ष डॉ.अजेय दुधाणे , आघाडीच्या युवा गायिका

सौ.किरण सावंत आदि मान्यवर उपस्थित होते.मनीष गोखले

यांनी सूत्रसंचालन केले.

डाॅ.मधुसूदन घाणेकर यांच्या

शीळवादन कारकिर्दीस 60 वर्ष 

पूर्ण झाली असून त्यांना शीळवादनासाठी मिलेनियम

इंटरनॅशनल ॲवाॅर्ड, व्हिसल ऑफ द वर्ल्ड ॲवाॅर्ड आदि आंतरराष्ट्रीय पातळीवरील सर्वोच्च बहुमान प्राप्त झाले आहेत. भारतासह 17देशात

डाॅ.मधुसूदन घाणेकर यांचे

शीळवादनाचे हजारो प्रयोग

गाजले असून त्यांच्या नावावर 

शीळवादनाचे अनेक विश्वविक्रम 

नोंदवले गेले आहेत.2014 मधे

महंमद रफी यांची सलग 112गाणी सादर करण्याचा त्यांच्या नावावर विश्वविक्रम आहे.रफी यांची सही, त्यांचा

भाग्यांक तसेच कुंडली आणि

रफींची गाणी असा डाॅ.मधुसूदन घाणेकर यांचा बहुढंगी कार्यक्रम 

लोकप्रिय ठरला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

फॉलोअर