*सौ.प्रतिमा अरुण काळे यांनी आपला वाढदिवस वृध्दाश्रमात साजरा केला.*
प्रत्येकाच्या आयुष्यात वाढदिवस हा खुप उत्साहाचा सोहळा असतो.२९ जुलै,हा सौ.प्रतिमा अरुण काळे,निगडी प्राधिकरण पुणे,४४,लेखिका, कवयित्री,शिक्षिका,सामाजिक कार्यकर्त्या. माणुसकीची जान ठेवून नित्य वाटचाल करणाऱ्या.....सडेतोड उत्तर देणाऱ्या,अन्यायाला वाचा फोडणाऱ्या,आपल्या हक्क व कर्तव्याची जान असणाऱ्या,निर्भीड,वैज्ञानिक विचाराच्या,कारणमिमांसा करणाऱ्या ....यांनी आपला वाढदिवस त्रिवेणीनगर येथील आनंदधन या वृध्दाश्रमात आपल्या कुटुंबासोबत मोठ्या आनंदात साजरा केला.तेथील आजींच्या मुखावरील हास्य....ही त्यांच्यासाठी...अनमोल भेट ठरली. कित्येक महिला या कमी वयाच्या असून ही तेथे होत्या....तेथे त्यांना.....आपली मैत्रीण,हक्काची माणसे वाटत होती.महिलांना कॉटनचे गाऊन,किराणा सामान देवून......त्यांच्या संगतीने केक कापून वाढदिवस साजरा केला.तेथील ताईंनी औक्षण करून,मनापासून आशिर्वाद दिलेत..ही अनमोल भेट नित्य संगती जपेल.....यातून सामाजिक कार्य करण्याची प्रेरणा मिळते.तेथील दादांनी ही उत्तम सहकार्य केले.प्रत्येकाने आपले वाढदिवस वृध्दाश्रम,अनाथाश्रम,मतिमंद मुलांच्या शाळेत साजरे करावे...त्यातून जो आनंद मिळतो तो गगनात मावेनासा होतो.


stay connected