शिवसेना विरुद्ध शिवसेना : मुख्यमंत्री शिंदे आणि आदित्य ठाकरेंची तोफ धडाडणार ?
Amol Borude Pune
तेजवार्ता पुणे : माजी मंत्री आदित्य ठाकरे निष्ठा यात्रेच्या माध्यमातून पक्ष संघटना आणि कार्यकर्त्यांच्या बैठकीवर भर देत आहेत. आतापर्यंत ते नाशिक, मराठवाडा, कोकण आणि आज पुण्यात शक्तीप्रदर्शन करत आहेत. दुसरीकडे, आदित्य ठाकरे ज्या ठिकाणी गेले आहेत, त्याच ठिकाणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सरकारची भूमिका आणि त्यांनी घेतलेला निर्णय कसा योग्य आहे, हे पटवून देत आहेत. पण पहिल्यांदाच हे दोघे एकाच दिवशी, एकाच शहरात दाखल होत आहेत. विशेषत: आदित्य ठाकरे तानाजी सावंत यांच्या घरामागे शक्तीप्रदर्शन करत आहेत. तर मुख्यमंत्री हे नेत्यांची भेट घेऊन पुण्यातील जनतेच्या समस्या जाणून घेणार आहेत.
गेल्या दहा दिवसांपासून आदित्य ठाकरे निष्ठा यात्रेच्या माध्यमातून शिवसैनिक आणि जनतेशी संवाद साधत आहेत. शिवाय याला चांगला प्रतिसाददेखील मिळत आहे. या पुणे शहरात आ. तानाजी सावंत यांच्या बंडानंतर त्यांचे कार्यालय फोडण्यात आले आणि त्यांच्या घरासमोर निदर्शनेही करण्यात आली. त्यानंतर आदित्य ठाकरे आज पुण्यात येऊन काय बोलणार ? याकडे लक्ष लागले आहे.
आदित्य ठाकरे यांनी आतापर्यंत बंडखोर आमदारांवर टीकास्त्र सोडलं आहे. शिवाय, आता सोमवारी सिंधुदुर्गातील बंडखोरांशी गद्दारी झाल्याचेही त्यांनी नमूद केले. त्यामुळे ते आता पुण्यात काय टीका करणार? हे पहाणे महत्त्वाचे ठरणार आहे. त्यांनी गेल्या दहा दिवसांपासून सुरू केलेल्या निष्ठा यात्रेला राज्यभरातून प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे पुणेकर याला कसा प्रतिसाद देतात ? हेदेखील पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. दरम्यान, मुख्यमंत्री आणि आदित्य ठाकरे एकाच दिवशी एकाच शहरात येण्याची ही पहिलीच वेळ आहे.


stay connected