वंचित बहुजन आघाडी जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गण सर्व ची सर्व जागा लढवणार..... महासचिव किशोर भोले...
... आगामी काळात होऊ घातलेल्या गेवराई तालुक्यातील १०जिल्हा परिषद गट व २०पंचायत समिती गण अशा सर्वची सर्व ३० जागा वंचित बहुजन आघाडी गेवराई तालुक्याच्या वतीने मोठ्या ताकदीने लढवणार आहे देशाचे स्वाभिमानी नेते अँड बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशानुसार प्रदेश अध्यक्षा सौ रेखाताई ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली प्रा विष्णू जाधव सर मराठवाडा अध्यक्ष अशोक भाऊ हिंगे पाटील बीड जिल्हा प्रभारी प्रा किसन चव्हाण सर तथा बीड जिल्हा अध्यक्ष उद्धव खाडे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आगामी होत असलेल्या जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुक वंचित मोठ्या ताकदीने लढवणार असून ओबीसीना जास्तीत जास्त उमेदवारी देण्यात येणार आहे यामध्ये संविधानिक हक्क आणि अधिकारा पासून कोसो दूर असलेल्या शोषित पिडीत शेतकरी शेत मजूर भूमिहीन उसतोड कामगार तसेच वंचित घटकांतील व्यक्तीना उमेदवारी प्राध्याने दिली जाणार आहे होऊ घातलेल्या निवडणूका यापुढे वंचित बहुजन आघाडी सर्व तयारीनिशी लढणार आहे वंचित बहुजन आघाडी गेवराई तालुका अध्यक्ष पप्पू गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक रिंगणात उतरणार असून जिल्हा परिषद सभागृहात तथा पंचायत समितीमध्ये विजयी गुलाल घेतल्याशिवाय शांत बसणार नाही त्यामुळे येणारी जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीत घराणेशाहीला मोठा हादरा दिल्याशिवाय वंचित शांत बसणार नाही आणि यापुढे वंचित बहुजन आघाडी निर्णायक भूमिका घेतल्याशिवाय स्वस्त बसणार नाही अशा रोखठोक इशारा वंचित बहुजन आघाडीचे गेवराई तालुका महासचिव किशोर भोले यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिला आहे


stay connected