*अँड.घुले यांना अपमानास्पद वागणूक देणाऱ्या पाटोदा तहसिलदारवर कारवाई करावी म्हणून वकिल संघाचा ठराव*
➡️ उपविभागीय अधिकारी काय कारवाई करणार ह्याकडे पाटोदा वकिल संघाचे लक्ष?
पाटोदा *(गणेश शेवाळे)* पाटोदा दिवाणी व फौजदारी न्यायालय यांच्या आवारात दिनांक 25/07/2022 रोजी पाटोदा वकिल संघ अध्यक्ष व सचिव यांच्या विचाराणे व सर्वानुमते पाटोदा तहसिलदार वर कारवाई करावी म्हणून ठराव घेण्यात आला या बाबत सविस्तर वृत्त असे की पाटोदा तहसिल मध्ये दिनांक 21/07/2022 रोजी प्रकरण क्र 2022/जमा/आरओआर/कावि/13/22 या प्रकरणात वकिल संघाचे सदस्य अँड आर.एस.घुले हे अर्जदार क्र.1जालिंदर विश्वनाथ बिनवडे यांचे वतीने वकिलपञ व अर्ज दाखल करणेसाठी गेले असता तहसिलदार यांनी अँड.आर.एस.घुले यांना सदर तहसीलदार यांनी वकिलपञ व अर्ज स्विकारण्यास नकार करून त्यांना चालू न्यायदान कामात बाहेर व्हा अशा भाषेत त्यांचा अपमान केला असल्यामुळे सदरचे कृत्य हे नियमात नसुन हे वकिल सदस्यांना कामकाज करणेच्या दृष्टीने अडचणीचे व अडथळा आणनारे असल्यामुळे पाटोदा वकिल संघाने 25/07/2022 रोजी अध्यक्ष सचिव व सर्वानुमते ठराव घेण्यात आला असून पाटोदा उपविभागीय अधिकारी साहेबांनी पाटोदा तहसीलदार यांच्या विरुध्द योग्य तो आदेश पारीत करावा अशी मागणी पाटोदा वकिल संघाने केली आहे

stay connected