खुंटेफळ साठवण तलाव अंतर्गत तीन गावांचे पुनर्वसन आणि भूसंपादन करून तलावाचे काम पूर्णत्वाला न्यावे..
*************************
खुंटेफळ, कुंबेफळ आणि सोलापूरवाडी ग्रामपंचायतींने मासिक सभेमध्ये ठरावाद्वारे ..
आ. सुरेश धस यांना घातले साकडे ...
*****************************
आष्टी (प्रतिनिधी )
आष्टी तालुका हा सतत अवर्षणाशी सामना करत असून पावसाच्या लहरीपणावरील या ठिकाणची शेती अवलंबून असल्याने ..आष्टी तालुक्यासाठी वरदान ठरणाऱ्या खुंटेफळ साठवण तलावाचे मंजुरीचे.. श्रेय आमदार सुरेश धस यांनाच असून...
या तलावाकडे गेल्या दहा वर्षापासून दुर्लक्ष झाल्याने परिसरातील शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे ..त्यामुळे या तलावासाठी खुंटेफळ, कुंबेफळ आणि सोलापूर वाडी या गावांमधील शेतकऱ्यांचे जमिनीचे भूसंपादन ,आणि या तीनही गावांचे पुनर्वसन लवकरात लवकर करण्यासाठी आमदार सुरेश धस यांना तीनही ग्रामपंचायतीने मासिक सभेमध्ये ठरावाद्वारे खुंटेफळ साठवण तलावाचे काम पूर्णत्वाला नेण्यासाठी साकडे घातले आहे.. या तीनही ग्रामपंचायतीच्या सरपंचांनी याबाबतचे निवेदन प्रसिद्ध केले आहे..
या निवेदनामध्ये म्हटले आहे की ,
आष्टी तालुक्यातील 2700 हेक्टर जमीन ओलिताखाली येऊ शकेल इतकी सिंचन क्षमता असलेला हा साठवण तलाव असून.. आमदार सुरेश धस यांनी अत्यंत कठोर परिश्रम करून या तलावास शासनाकडून मंजुरी मिळवलेली आहे ...
परंतु गेल्या आठ वर्षांमध्ये या तलावाचे काम पूर्णपणे ठप्प होते ..आता यापुढे या तलावाचे काम लवकरात लवकर करणे गरजेचे आहे या खुंटेफळ साठवण तलावा मध्ये खुंटेफळ,(पुंडी )सोलापूरवाडी आणि कुंभेफळ या गावातील शेतकऱ्यांच्या जमिनींचे भूसंपादन करावयाचे असून शेतकरी आमदार सुरेश धस यांच्या वर विश्वास ठेवून.. जमिनी देण्यासाठी तयार आहेत.. या शेतकऱ्यांच्या जमिनी नवीन भूसंपादन कायद्याप्रमाणे मोबदला देऊन भूसंपादन करण्यात याव्यात तसेच या तीनही गावांचे पुनर्वसन करावयाचे असल्यामुळे हे काम देखील प्राधान्याने आणि गतीने करण्याची आवश्यकता आहे ...शासन दरबारी पाठपुरावा करून विकास कामे करून आणण्याचे कौशल्य आमदार सुरेश धस यांना असल्यामुळे त्यांनी या खुंटेफळ साठवण तलावाच्या पूर्णत्वासाठी शेतकऱ्यांच्या जमिनीचे भूसंपादन आणि तीनही गावच्या लोकांच्या हिताच्या दृष्टीने योग्य अशा ठिकाणी पुनर्वसन प्रक्रिया लवकरात लवकर करावी ... जेणेकरून हा तलाव पूर्ण होऊन दुष्काळी परिस्थितीशी सामना करणाऱ्या शेतकऱ्यांना सिंचनासाठी पाणी उपलब्ध होऊन आष्टी तालुका सुजलाम सुफलाम होणार आहे ...त्यामुळे आमदार सुरेश धस यांनी लवकरात लवकर या साठवण तलावाचे काम पूर्ण करण्यासाठी शासन दरबारी शेतकऱ्यांचे प्रश्न मार्गी लावावेत ..असेही निवेदनात शेवटी म्हटलेले आहे
या तलावामध्ये बाधित होणाऱ्या सोलापूर वाडी ग्रामपंचायतच्या सरपंच अर्चना मनोज थोरवे, उपसरपंच प्रियंका अजिनाथ थोरवे ,कुंबेफळ या ग्रामपंचायतच्या सरपंच ज्योती बाबासाहेब मुठे, उपसरपंच संगीता गंगाधर काकडे, तसेच खुंटेफळ,(पुंडी )या ग्रामपंचायत च्या सरपंच मनीषा दिनेश थोरवे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत .. या तीनही ग्रामपंचायतच्या मासिक सभेमध्ये वरील विषयाबाबतचे ठराव पारित करून त्याच्या प्रती आमदार सुरेश धस यांच्याकडे सादर करण्यात आलेले आहेत..


stay connected