नागपंचमीच्या दिवशी नाभिक समाज आपला सलून व्यवसाय का करीत नाहीत.....?? *🐍 नागपंचमी विशेष 🪱* संकलन : संजय पंडित

 नागपंचमीच्या दिवशी नाभिक समाज आपला सलून व्यवसाय का करीत नाहीत.....??

         *🐍 नागपंचमी विशेष 🪱*

संकलन : संजय पंडित




नाभिक पुराणात आणि इतरही ग्रंथात नाभिक समाजाची उत्पत्ती व नागपंचमीचे महत्त्व याविषयी माहिती दिलेली आहे. नाभिक पुराण कथेनुसार नाभिकाची उत्पत्ती शंकराच्या नाभीतून झाली,अशी कथा आहे. पृथ्वीवर जलप्रलय झाला तेव्हा भगवान शंकराने तिसरा डोळा उघडून तो थांबवला. पृथ्वीवर समुद्र, पर्वत व नद्यांची निर्मिती केली; तर आकाशात चंद्र, सूर्य, तारे आणि नक्षत्रांची स्थापना केली. शंकराच्या कृपेने विष्णूच्या नाभीतून ब्राह्मणाची उत्पत्ती झाली. तो चतुर्मुख होता. त्या ब्राह्मणाला शंकराने सृष्टीची निर्मिती करण्यास सांगितले. तेव्हा विष्णूने शंकराला सांगितले, की ब्राह्मणाचे मुंजबंधन झाल्याशिवाय त्यास ब्राह्मणत्व प्राप्त होणार नाही. मुंजसाठी जानवे व शिखाची गरज होती. शिखाचे काम कोणी करावे, हा प्रश्न निर्माण झाला. शिखा प्राप्त होण्यासाठी नाभिकाची निर्मिती आवश्‍यक होती. तेव्हा भगवान शंकराने आपल्या कंठातील शेषाला स्वत:च्या नाभीकमलातून जन्म घेण्यास सांगितले. तेव्हा शेषाने भगवान शंकराला विचारले, की "जन्मानंतर मला कशाची प्राप्ती होईल?' शंकर उत्तरले, "तुला सर्व कामांत मोठा मान प्राप्त होईल. तुझ्याशिवाय ब्राह्मणाला ब्राह्मणत्व प्राप्त होणार नाही. सर्वांचा आवडता होशील व श्रावण महिन्यातील नागपंचमीस तुझे पूजन केले जाईल. स्त्रियांचा तू भाऊ होशील. तुझ्या वंशात उत्पन्न झालेल्या सर्वांना मान देतील.' ही सर्व कथा ऐकून शेषाने शंकराच्या नाभीतून मनुष्यरूपाने जन्म घेतला. शंकराच्या नाभीतून जन्म घेतल्यामुळे तो शेषनाग झाला. नाभिक म्हणजेच शेषनाग आहे. शेषनागाचा वंशज आहे. तेव्हापासून नागपंचमी दिवशी शेष नागाचे वंशज म्हणून नाभिक समाजबांधव आपले व्यवसाय नागपंचमीस बंद ठेवतात....


*🌹सर्व नाभिक समाज बांधवांना नागपंचमी सणाच्या मंगलमय शुभेच्छा...🌹*

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

फॉलोअर