झोपलेल्या पुरातत्त्व विभागाला जागे करण्यासाठी नगरसेवक राजु जाधव यांचा मंदिराच्या दारात शंखनाद

 झोपलेल्या पुरातत्त्व विभागाला जागे करण्यासाठी नगरसेवक राजु जाधव यांचा मंदिराच्या दारात शंखनाद



पाटोदा (शेख महेशर) :- पाटोदा शहरातील संगमेश्वर मंदिर हे पुरातन असून ते हेमाडपंती महादेवाचे मंदिर आहे.जवळ पास साडेतीनशे ते चारशे वर्षांपूर्वीचे असल्याची आख्यायिका असून सदर मंदिर हे पुरातत्त्व विभाग कडे वर्ग करण्यात आलेले आहे. व त्या विभागामार्फत या ठिकाणी संरक्षण भिंत व मंदिराच्या परिसरातील फरशी बसविण्यात आलेली आहे. मंदिराच्या दुरूस्तीचे काम चालू असताना मंदिराच्या शिखराचे काम कॉन्ट्रॅक्टरच्या चुकीच्या पद्धतीमुळे मंदिराचे कळसा सह शिखर पूर्णपणे ढासळलेले आहे. व संरक्षण भिंत अर्धवट करण्यात आलेली आहे, त्या भिंतींचे बांधकाम पूर्ण करण्यात यावे, जेणेकरून बाकीचे मंदिर पडणार नाही.अशी वेळोवेळी मागणी करून ही पुरातत्व विभाग याची दखल घेत नाही म्हणून पहिल्या श्रावण सोमवारी पुरात्व विभागाला जागे करण्यासाठी नगरसेवक राजु जाधव यांनी ग्रामस्थाना घेऊन मंदिराच्या दारात शंखनाद आंदोलन केले. या वेळी आंदोलनकर्त्यांनी पुरात्वविभागाच्या अधिकाऱ्यांना तात्काळ शिखर उभारण्यात यावा. व त्याचा प्रस्ताव शासनाकडे प्रस्तावित करावा, वारंवार पत्रव्यवहार करून ही याच्या कडे दुर्लक्ष केले जात असून लवकर मंदिराचे काम चालू झाले नाही तर या पेक्षा मोठे आंदोलन करण्यात येईल असा इशारा नगरसेवक राजु जाधव यांनी दिला आहे. पाटोदा शहराच्या वैभवात भर टाकणाऱ्या श्री संगमेश्वर मंदिराच्या पुन:र्निर्माणासाठी शहरातील सर्व नागरिकांनी व शिवभक्तांनी घंटानाद आंदोलनात सहभाग नोंदवला, व पुरातन विभाग संभाजीनगरचे सहाय्यक संचालक 

श्री.गोटे साहेब यांना निवेदन देण्यात आले. या वेळी नगरसेवक राजु भैय्या जाधव, ह.भ.प.रणजित (दादा) जाधव, ह.भ.प. रामकृष्ण रंधवे (बापू) महाराज, पत्रकार महेश बेदरे, युवा नेते संदीप दादा जाधव, राहुल जाधव, स्वामी सानप, लक्ष्मण सस्ते यांच्या सह अनेक बहुसंख्येने वारकरी संप्रदायाचे भजनी मंडळी व पाटोदा शहरातील ग्रामस्थ या वेळी उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

फॉलोअर