महाराष्ट्र द्रोही राज्यपालांचा निषेध म्हणून मुळशीत युवासेनेकडून स्वाक्षरी मोहीम
अमोल बोरुडे/पुणे
तेजवार्ता पुणे : मुंबईतून गुजराती-राजस्थानी गेले तर मुंबई आर्थिक राजधानी राहणार नाही;असे वादग्रस्त वक्तव्य करून महाराष्ट्र राज्याचा अपमान करणाऱ्या राज्यपाल भगतसिंह कोशारी याचा निषेध म्हणून *युवासेना पश्चिम महाराष्ट्र विभागीय सचिव अविनाशभाऊ बलकवडे यांच्या मार्गदर्शनाखाली युवासेना उपजिल्हाधिकारी संतोष तोंडे, तालुकाधिकारी दत्ता झोरे, राम गवारे यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये युवासेना मुळशी तालुक्याच्या वतीने घोटावडे फाटा येथे स्वाक्षरी मोहीम राबविण्यात आली.
राज्यपाल महोदय मागील दोन - तीन वर्षापासून महाराष्ट्रामध्ये राहत असून त्यांना महाराष्ट्राचा इतिहास माहिती नाही. तरीही सातत्याने महाराष्ट्र विरोधी वक्तव्य करत आलेले आहे.त्यामुळे राज्यपाल या घटनात्मक पदाची प्रतिष्ठा धूळीस मिळवली आहे.म्हणून यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करून केंद्राने यांना ताबडतोब बोलावून घ्यावे अशी मागणी यावेळी करण्यात आली.
याप्रसंगी जेष्ठ नेते आबासाहेब शेळके,उपतालुका समन्वयक विष्णू ढोरे, उपतालुकाप्रमुख मोहन शिंदे, उपतालुकाधिकारी अभिजित नलावडे, माऊली चोंधे,विभाग अधिकारी अंकुश मरगळे,साहिल लिंबोरे,सोमनाथ महाडिक आदी पदाधिकारी आणि युवासैनिक उपस्थित होते.



stay connected