गंगाई फार्मसी कॉलेज कडा कॉलेजचे घवघवीत यश
आष्टी प्रतिनिधी
आनंद चॕरीटेबल संस्था संचलीत गंगाई फार्मसी कॉलेज कडा ता .आष्टी,जि बीड .या कॉलेजचा निकाल ९४.४० टक्के लागला असून या सर्व उत्तीर्ण झालेल्या तसेच विषेश गुण प्रविण्य मिळालेल्या विदयार्थ्याचे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मा.आ. भीमरावजी धोंडे साहेब तसेच संस्थेचे डायरेक्टर डॉ.अजय (दादा) भीमराव धोंडे व श्री अभयराजे धोंडे यांनी हार्दिक अभिनंदन केले तसेच संस्थेचे प्रशासकीय अधिकारी डॉ. राउत डी. बी. श्री. शिवदास विधाते श्री. दत्तात्रय गिलचे, श्री. माऊली बोडखे श्री. शिवाजी वनवे, श्री. संजय शेंडे व प्राचार्य अशोक गदादे सर यांनी या यशाबद्दल सर्व विदयार्थ्यांचे तसेच या निकालात महत्वपूर्ण वाटा असलेल्या सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचा-यांचे हार्दीक अभिनंदन केले. या मध्ये प्रथम वर्षाचा निकाल ९९ टक्के लागला आहे प्रथम वर्षात प्रथम कु.चव्हाण स्नेहल संजय ८९.९०% , दितीय जाधव रविराज दिलीप ८६.२०% , तृतीय कु.चव्हाण शिवानी झुंबर ८५.९०% घेवून प्रविन्य मिळवले . तसेच या वर्षी द्वितीय वर्षात सोले सुरज शिवाजी ८९.८०% व कु.तांबे माहेश्वरी अशोक ८९.८०% दोघेही प्रथम आले आहेत व व्दीतीय कु.गोणेवार ज्योतीलक्ष्मी व्यंकटेश ८५.२०% व तृतीय परदेशी उत्कर्ष विक्रम ८५.००% घेऊन प्राविण्य मिळवले व द्वितीय वर्षाचा निकाल हा ९१% टक्के लागला आहे ही उन्हाळी परीक्षा जुन महिण्यामध्ये घेण्यात आली होती या यशाचे मुळ कारण सांगताना प्राचार्य अशोक गदादे सर म्हणाले की कोवीड १९ नंतर हे वर्ष पूर्ण ऑफलाइन मध्ये घेण्यात आले. त्यामुळे वेगवेगळया प्लॅटफॉर्म द्वारे विदयार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. शिक्षकांनी विदयार्थ्यांकडे दिलेले वैयक्तीक लक्ष, शिक्षकांनी विद्यार्थ्यांसाठी घेतलेले वेगवेगळे उपक्रम त्याचे व्हायवा , सराव परिक्षा, चाचणी परीक्षा, गेस्ट लेक्चर, एक्स्पर्ट लेक्चर तसेच विद्यार्थ्यांसाठी असलेले वेगवेगळे मेंटोर्स यांनीही विद्यार्थ्यांना वैयक्तिक मार्गदर्शन केले. २०२१-२२ मध्ये गंगाई फार्मसी कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी वेगवेगळे प्रोग्राम घेण्यात आले यामध्ये द्वितीय वर्षाच्या विद्यार्थ्यांसाठी तीन प्रोजेक्ट व प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांसाठी एक प्रोजेक्ट घेण्यात आला. तसेच क्वीझ कॉम्पिटिशन, सेमिनार, पोस्टर प्रेझेंटेशन, पेशंट काउंसलिंग, इंडस्ट्री एक्सपर्ट लेक्चर, इंटलेक्चुअल प्रॉपर्टी अव्हेरनेस मिशन अंतर्गत सेमिनार, तसेच विद्यार्थ्यांचे पेपर प्रेझेंटेशन कॉम्पिटिशन यामध्ये एका विद्यार्थिनी कु.गोणेवार ज्योतीलक्ष्मी व्यंकटेश ने आपला पेपरही पब्लिश केलेला आहे. हे या घवघवीत निकालामागचे कारण आहे तसेच विदयार्थ्यांना कॉलेजचे शिक्षक अनिकेत डाके, रागिणी सोळंके, राहूल दानवे, मंगल लाटे, साईनाथ पांढरे, काजल देवकर, , भाऊसाहेब कणसे, श्री राऊत, विकास अनारसे, पल्लवी घोलप , गणेश गांजूरे, संगिता राऊत, किशोर शिंदे यांचे मार्गदर्शन विदयार्थ्यांना लाभले असेही प्राचार्य अशोक गदादे यांनी सांगितले.


stay connected