.
हर घर तिरंगा " या अभियानात ; तालुक्यातील - सर्व नागरिकांनी सामील व्हावे आणि आपल्या घरावर तिरंगा फडकवावा - तहसीलदार गुंडमवार
आष्टी /प्रतिनिधी
हर घर तिरंगा या अभियानात तालुक्यातील सर्व नागरिकांनी सहभागी व्हावे आणि आपल्या घरावर तिरंगा फडकावा तसेच आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांना याबाबत जागृती करून घरोघर राष्ट्रीय ध्वज फडकावा असे आवाहन तहसीलदार विनोद गुंडमवार यांनी आष्टी येथील महात्मा गांधी माध्यमिक विद्यालय आष्टी येथे झालेल्या मुख्याध्यापकांच्या बैठकीत केले. याप्रसंगी गट विकास अधिकारी सुधाकर मुंडे गट शिक्षणाधिकारी सुधाकर यादव उपस्थित होते.
घरो घरी तिरंगा हर घर तिरंगा अभियाना अंतर्गत दिनांक १३ ते १५ ऑगस्ट या दरम्यान , " " घरोघरी तिरंगा " अर्थात अमृत महोत्सव महाराष्ट्र शासन " आजादी का अमृत महोत्सव " " हर घर तिरंगा " या अभियानात ; राज्यातील -सर्व नागरिकांनी सामील व्हावे आणि आपल्या घरावर तिरंगा फडकवावा . तसे शाळे महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना यामध्ये सक्रिय रित्या सहभागी करून हा राष्ट्रीय सण उत्साह मध्ये साजरा करावा असे आवाहन त्यांनी केले. तर गट विकास अधिकारी मुंडे यांनी देखील मुख्याध्यापकांच्या बैठकीत सर्व मुख्याध्यापकांनी सर्व स्तरातील विद्यार्थ्यांना या बाबत जागृती करून 13 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट या दरम्यान हर घर तिरंगा या अभियानाचे उस्फूर्तपणे साजरा करण्याचे आवाहन केले. पुढे बोलताना गुंडमवार म्हणाले की, आपल्या राष्ट्रध्वजाची मागणी ग्रामपंचायत , तलाठी कार्यालय , स्वस्त धान्य दुकान , पोस्ट ऑफिस यांच्याकडे नोंदवू शकता किंवा इतर ठिकाणा वरून ही राष्ट्रध्वज खरेदी करू शकता .. राष्ट्रध्वजाचा मान व सन्मान राखून या अभियानात आपल्या घरावर तिरंगा ध्वज फडकवू या आणि स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवात सामील होऊ या असे त्यांनी यावेळी सांगितले.
या कार्यक्रमास तहसीलदार विनोद गुंडमवार, गट विकास अधिकारी सुधाकर मुंडे गट शिक्षणाधिकारी सुधाकर यादव, शाळेचे मुख्याध्यापक व पत्रकार जावेद पठाण, सर्व तालुक्यातील मुख्याध्यापक, मुख्याध्यापिका, शालेय पोषण आहाराचे आव्हाड साहेब, शिक्षक कर्मचारी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक आव्हाड यांनी केले तर आभार प्रदर्शन शाळेचे सहशिक्षक संदेश जगताप यांनी मानले.


stay connected