" हर घर तिरंगा " या अभियानांतर्गत प्रत्येक घरावर राष्ट्रध्वज उभारून अभिमानाने राष्ट्रप्रेम व्यक्त करावे... ********************************* आमदार सुरेश धस यांचे आवाहन

 " हर घर तिरंगा " या अभियानांतर्गत प्रत्येक घरावर राष्ट्रध्वज उभारून अभिमानाने राष्ट्रप्रेम व्यक्त करावे...
*********************************
 आमदार सुरेश धस यांचे आवाहन

*********************************



*********************************

आष्टी (प्रतिनिधी) 

भारत देश ही एक महासत्ता बनली असून देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या चमकदार नेतृत्वाने जागतिक पातळीवर ठसा उमटवला असून त्यांनी भारतीय स्वातंत्र्याच्या ७५ व्या वर्षानिमित्त "आजादी का अमृत महोत्सव "हा उपक्रम साजरा करताना संपूर्ण देशामध्ये "हर घर तिरंगा" हे अभियान राबवण्याची घोषणा केली आहे.त्याला भरभरून प्रतिसाद देण्यासाठी समाजातील प्रत्येक घटकाने आपल्या घरावर, खाजगी कार्यालयावर,व्यावसायिक जागी,शासकीय कार्यालयात दि.13,14 आणि 15 ऑगस्ट या स्वातंत्र्यदिनी सलग तीन दिवस तिरंगा राष्ट्रध्वज उभारणी करून जाज्वल्य राष्ट्राभिमान प्रकट करावा असे आवाहन आमदार सुरेश धस यांनी केले.       

               तहसील कार्यालय,आणि पंचायत समिती आष्टी यांच्या संयुक्त विद्यमाने  "उमेद"  महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत उडान महिला ग्रामसंघ कडा यांच्यावतीने आयोजित राष्ट्रध्वज विक्री केंद्राचे उदघाटन कार्यक्रमांमध्ये प्रमुख मार्गदर्शन करताना ते बोलत होते.

यावेळी व्यासपीठावर तहसीलदार विनोद गुंडमवार,गटविकास अधिकारी सुधाकर मुंडे, सहाय्यक गटविकास अधिकारी प्रभाकर अनंत्रे,साहाय्यक प्रशासन अधिकारी काशिनाथ महाजन, त्रिदल सैनिक संघटनेचे बीड जिल्हाअध्यक्ष अंकुश खोटे,ज्येष्ठ पत्रकार प्रफुल्ल सहस्त्रबुद्धे आदी उपस्थित होते..

            आ. सुरेश धस पुढे म्हणाले की, भारताच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्यानंतर सध्याचे पंतप्रधान नरेंद्र भाई मोदी यांनी जागतिक पातळीवर आपल्या दमदार आणि तेजस्वी नेतृत्वाची चमक दाखवली असून भारत देश ही महासत्ता होण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे.यापूर्वी आपण स्वातंत्र्य दिन, प्रजासत्ताक दिन, महाराष्ट्र दिन असे उत्सव साजरा करताना तिरंगा ध्वजाची उभारणी करत होतो.परंतु या कार्यक्रमांमध्ये केवळ शासकीय, निमशासकीय, कार्यालयीन कर्मचारी,शिक्षक आणि विद्यार्थी यांनाच राष्ट्रगीत आणि ध्वजवंदनाची संधी मिळत असे. हे प्रमाण अत्यल्प असे असून अलीकडच्या युवा पिढीला स्वातंत्र्याचे महत्त्व समजावून सांगण्याची आवश्यकता आहे.कारण त्यांना पारतंत्र्याचा अनुभव नसल्यामुळे स्वातंत्र्य मिळवताना किती जणांनी प्राणार्पण केले? किती जणांनी देशासाठी बलिदान दिलेले आहे.याची कमी प्रमाणात माहिती असल्यामुळे पंतप्रधान नरेंद्र भाई मोदी यांनी भारतीय स्वातंत्र्याच्या ७५ व्या वर्षाचे निमित्ताने अमृत महोत्सव साजरा करण्यासाठी प्रत्येक भारतीय नागरिकाला देश प्रेम, राष्ट्रभक्ती, प्रकट करण्याची संधी निर्माण केली आहे.भारत देशातील प्रत्येक घरावर " तिरंगा " फडकवण्याची त्यांनी संकल्पना मांडली आहे. शहरीभाग, ग्रामीण भाग विशेषतः समाजाचा शेवटचा घटक समजला जाणारा आदिवासी,वनवासी, दुर्गम भागातील नागरिक यांना या अभियानामध्ये सहभागी करून घेण्यासाठी आपण सर्वांनी मिळून प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे असे सांगितले या कामी आपण सर्वतोपरी मदत करणार असल्याचे सांगत सर्व सरपंच, ग्रामसेवक, तलाठी, शिक्षक, सामाजिक कार्यकर्ते, आणि विशेषतः समाजातील सर्वात महत्त्वाचा आणि देशाचा अभिमान वाटावा असे सैन्य दलातील माजी कर्मचारी माजी सैनिक यांची संघटना असलेली बीड जिल्हा त्रिदल सैनिक संघटना यांनी या कामी महत्वपूर्ण भूमिका बजावावी.अशी अपेक्षा व्यक्त केली.

            यावेळी बोलताना तहसीलदार विनोद गुंडमवार यांनी सलग तीन दिवस राष्ट्रध्वज उभारणीचे नियम आणि पद्धती विशद केली. दि.१३ ऑगस्ट रोजी सकाळी ७.०० वाजता ध्वजाची उभारणी करावी आणि दि. १५ ऑगस्ट रोजी सायंकाळी अस्तमानावेळी ध्वज उतरवावा असे सांगून ध्वजाचे पावित्र्य राखण्याची खबरदारी घ्यावी चूक होऊ देऊ नये.याची काळजी घ्यावी आणि समारंभ पूर्वक राष्ट्र अभिमान प्रकट करावा असे आवाहन केले.यावेळी गटविकास अधिकारी सुधाकर मुंडे यांनी संपूर्ण तालुकाभर आवश्यक असणारे राष्ट्रध्वज आम्ही उपलब्ध करून देऊ प्रत्येकी २३.०० रुपये अशी या ध्वजाची किंमत असून पंचायत समिती अंतर्गत राष्ट्रध्वज विक्री कक्ष सुरू करण्यात आलेला आहे.. त्या ठिकाणी ध्वज उपलब्ध करून घ्यावेत असे आवाहन केले. यावेळी त्रिदल सैनिक संघटनेचे बीड जिल्हाध्यक्ष अंकुश खोटे आणि ज्येष्ठ पत्रकार प्रफुल्ल सहस्त्रबुद्धे यांचेही समायोजित भाषणे झाली.आभार प्रदर्शन  साहाय्यक प्रशासन अधिकारी काशिनाथ महाजन  यांनी केले.

यावेळी कनिष्ठ सहाय्यक सविता गोरे,

"उमेद "तालुका व्यवस्थापक मंगल हजारे विधाते, विक्रम ठोंबरे तसेच प्रभाग समन्वयक प्रमोद खेडकर,दासू शेलार, जालिंदर रंधवे, किशोर उबर हंडे, जयश्री ढेबरे, संदीप इंगळे, कडा  महिलाग्राम संघाच्या वैशाली सोनटक्के, प्रियंका साके ,अनिता पगारे, ललिता खेडकर यांची उपस्थिती होती.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

फॉलोअर