जिल्हा परिषद उच्च प्राथमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक बबन राऊत सेवानिवृत्त
====================
केज!प्रतिनीधी
केज तालुक्यातील सोनिजवळा येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक विद्यालय सोनिजवळा शाळेचे मुख्याध्यापक म्हणून कार्यरत असणारे शिक्षक बबन राऊत हे नियत वयोमानाप्रमाणे सेवानिवृत्त झाले.
याबाबत सविस्तर वृत्त असे की,सोनिजवळा येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेत कार्यरत असणारे शिक्षक बबन राऊत हे नियत वयोमानाप्रमाणे सेवानिवृत्त झाल्याने त्यांचा सेवानिवृत्ती कार्यक्रम सोनिजवळा येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत आयोजित करण्यात आला होता.सोनिजवळा येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेत कार्यरत असणारे विद्यार्थी प्रिय शिक्षक म्हणून बबन राऊत यांची ओळख होती 58 व्या वर्षी ते नियमाप्रमाणे आज सेवानिवृत्त झाले.अत्यंत हलाखीच्या परिस्थितीतून पुढे आलेले बबन राऊत यांची केज तालुक्यातील ,सातेफळ, तांबवा, मैंदवाडी, केज, मांगवडगाव ,सोनिजवळा या गावी नौकरी केली
वयाच्या एकोनीस व्या वर्षी नौकरी लागली सहशिक्षक ते मुख्याध्यापक आस त्यांचा प्रवास,
.अत्यंत हुशार आणि विनोदी स्वाभाव आसल्याने प्रत्येक विध्यार्थी आपलासा करण्याचा त्यांचा हतखंडा होता ,
. विद्यार्थ्यांना आपलंसं करून अध्यापन करणे हे त्यांचे कौशल्य होते.केज तालुक्यात सहशिक्षक,मुख्याध्यापक, अशा पदावर आपली वेगळी ओळख निर्माण केली होती.विद्यार्थी आणि पालकांचा समन्वय साधून काम करण्याची त्यांची कला होती.केज तालुक्यात नौकरी लागली आणि केज तालुक्यातच सेवानिवृत्त झाले सोनिजवळा सारख्या गावात आपल्या वैशिष्ट्यपूर्ण शिकवणीतून व कामाच्या नियोजन पध्दतीने अनेक .गोर गरीबांचीमुलै शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी त्यांनी मेहनत घेतली.त्यांनी शिकवलेली अनेक विद्यार्थी आज विविध पदांवर कार्यरत आहेत.
आज 39 व्या वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर नियत वयोमानाप्रमाणे ते सेवानिवृत्त झाले.या कार्यक्रम प्रसंगी अध्यक्ष म्हणून सरपंच मुकुंद गायकवाड, तर प्रमुख पाहुणे म्हणून गटशिक्षण अधिकारी केंद्रे सर,डी एम चाटे सर, बी जी चाटे सर, बी बी काळकूटे, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष दशरथ चवरे, ग्रामविकास अधिकारी राजाभाऊ वरपे , उपाध्यक्ष वैजनाथ गायकवाड, मिनाज पठाण, बाळासाहेब कोकाटे, हमीद खाँ पठाण गोविंद ससाणे, अनिल ससाणे मकरध्वज सुर्यवंशी अरुण पटेकर, ग्रामपंचायत सेवक संभाजी वैरागे केज केंद्रातील सर्व शिक्षक, मित्रपरिवार, परीवारातील सहकुटुंब, आप्तेष्ट उपस्थित होते
माझ्या सेवानिवृत्तीच्या सत्कार समारंभासाठी माझी आई उपस्थित आहे या पेक्षा माझ भाग्य दुसर आसुच शकत नाही, माझ्या आईने खुप कष्टाने मला शिकवल, नौकरी लावली या पेक्षा माझ्या साठी आनंदाचा क्षण दुसरा असुच शकत नाही
सेवानिवृत्त शिक्षक
बबन राऊत


stay connected