वैभव मुंडेचा पनवेल नवी मुंबई आपघाती मृत्यु

 वैभव मुंडेचा पनवेल नवी मुंबई आपघाती मृत्यु 

----------------------------


केज दि.२८ ( प्रतिनिधी ) तालुक्यातील देवगाव येथील वैभव गोविंद मुंडे वय १८ वर्ष  या युवकाच पनवेल नवी मुंबई येथे मंगळवारी सायंकाळी सहाच्या दरम्यान आपघाती निधन  झाल्याने देवगाव परीसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

केज तालुक्यातील देवगाव येथील वैभव गोविंद मुंडे हा इलेक्ट्रॉनिक आय..टी.आय चे शिक्षण घेण्यासाठी पनवेल नवी मुंबई येथील  औद्योगिक प्रशिक्षण केंद्रात प्रथम वर्षात शिक्षण घेत होता.मंगळवार दि.२६ जूलै रोजी आपल्या मित्रा सोबत सांयकाळी रेल्वेमार्गावरून फिरत अस्ताना वैभव यास पाठीमागून येणा-या रेल्वे इंजिनचा धक्का लागला व तो युवक रेल्वे पटरीवर पडल्याने त्याचा जागीच मृत्यु झाला.वैभवच्या निधनाबद्दलची माहीती त्याच्या सोबत असलेल्या मित्राने वैभवच्या वडीलांना माहीती दिल्यानंतर वैभवच्या नातेवाइकांनी पनवेल येथे जाऊन बुधवारी सकाळी शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला.बुधवारी सांयकाळी देवगांव येथे वैभववर अंतिम संस्कार करण्यात आले. वैभव यांच्या पश्चात आई-वडील,आजी आजोबा,भाऊ बहीण सह नातेवाईक अशा मोठा परिवार आहे.वैभव च्या आपघाती निधनाने देवगाव परीसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

फॉलोअर