सुंबेवाडीत आय.सी.आय.सी.आय फाउंडेशन व ग्रामपंचायत यांच्या वतीने आंब्याच्या झाडांचे वाटप
दौलावडगाव - आष्टी तालुक्यातील सुंबेवाडी येथे आयसीआयसीआय फाउंडेशन व ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमानाने अल्पदरात, एकूण ३६ शेतकऱ्यांना प्रत्येकी १० केशर आंब्याचे कलम केलेले रोपे व त्याचा योग्य वाढीसाठी साठी लागणारे पोषक १० किलो कंपोस्ट खत असे एकूण ३६० आंब्याची झाडे व ३६० किलो कंपोस्ट खत शुक्रवार दि २९ जुलै रोजी वाटप करण्यात आले.
यासह ग्रामलोकसहभाग फाउंडेशनच्या माध्यमातून नदी खोलीकरणं, सेंद्रिय खत निर्मिती शेळी पालन प्रशिक्षण आदी व्यक्तिगत, सामाजिक लाभाचे समाजोपयोगी उपक्रम राबवत, सामाजिक बांधिलकी जपत, आयसीआयसीआय फाउंडेशन या सामाजिक संस्थेच्या वतीने सुंबेवाडी गावामध्ये राबवत येत असतात.
यावेळी आयसीआयसीआय फाउंडेशन.समन्वयक बाळासाहेब कांबळे, विद्यमान सरपंच, उपसरपंच ग्रा सदस्य, महिला व ग्रामस्थ उपस्थित होते.


stay connected