*"महाराष्ट्र डिजिटल मिडिया" ने घेतली* *चंद्रकांतदादांची सांत्वनपर भेट*

 *"महाराष्ट्र डिजिटल मिडिया" ने घेतली*
*चंद्रकांतदादांची सांत्वनपर भेट*


कोल्हापूर,दि.२५- मातृशोकात असलेले भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते व पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांची आज डिजिटल मिडिया संपादक पत्रकार संघटना महाराष्ट्राचे अध्यक्ष राजा माने व दक्षिण महाराष्ट्रातील पदाधिकाऱ्यांनी त्यांच्या निवासस्थानी सांत्वनपर भेट घेतली.यावेळी भाजपचे नेते आ.प्रसाद लाड हेही उपस्थित होते.संघटनेचे राज्य कार्यकारिणी सदस्य प्रमोद मोरे, कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष सुहास पाटील, सातारा जिल्हा अध्यक्ष विकास भोसले, कोल्हापूर शहराध्यक्ष प्रशांत चुयेकर, एकनाथ पाटील, नीतीन,बापरे, अण्णा तोडकर,माणिक डोंगरे, संभाजी थोरात, सुशांत साठे आदी पदाधिकारी उपस्थित होते.राजा माने सहवेदना व्यक्त करुन मुंबईसह महाराष्ट्रातील न्यूज पोर्टल्स, युट्यूब चॅनल्स आणि डिजिटल मीडियातील सर्व घटक त्यांच्या दु:खात सहभागी असल्याची भावना व्यक्त केली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

फॉलोअर