नीरज चोप्रा यांचे रुपेरी कामगिरी....!
भारतीय क्रीडा क्षेत्रात आपल्या मेहनतीच्या जिद्दीच्या जोरावर इतिहास घडवणारे नीरज चोप्रा यांनी जागतिक ऍथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेत कांस्यपदक जिंकून ८८.१३ मीटर भालाफेक करत रौप्य पदकावर आपल्या नावावर करणारे नीरज चोप्रा पहिले पुरुष खेळाडू ठरले आहेत.त्यांनी पहिल्याच प्रयत्नात ८८.३९ मीटर अंतरावर भाला फेकून अंतिम फेरीतील आपलं स्थान निश्चित केले होते.रविवारी पार पडलेल्या स्पर्धेत नीरज चोप्रा यांनी ८८.१३ मीटर अंतरावर फेकत विजय मिळवला.नीरज चोप्राने पुन्हा एकदा भारतासाठी ऐतिहासिक कामगिरी केली आहे. जागतिक चॅम्पियनशिपमध्ये पदक जिंकणारे ते अंजू बॉबी जॉर्जनंतर दुसरा ठरले आहेत.
नीरजच्या या यशाचे सर्व स्तरावरुन कौतुक होत आहे. महत्वाचे म्हणजे नीरजने या पदकाद्वारे भारताचा जागतिक अॅथलेटिक्स स्पर्धेतील पदकांचा पुन्हा एकदा इतिहास रचला.नीरज चोप्राने भालाफेकमधील कार्य अभिमानास्पद, कौतुकास्पद आहे. या स्पर्धेत नीरज चोप्राने रौप्य पदक पटकावले आहे.
या आधी जगातील सर्वात मोठी क्रीडा ऑलिम्पिक स्पर्धा जपानच्या राजधानी टोकियो येथे पार पडलेल्या होत्या .या स्पर्धेमध्ये सर्व जगातून स्पर्धक येऊन आपली कामगिरी दाखवत होते,त्यात आपले भारतीय खेळाडू आपल्या मेहनतीच्या जोरावर यश संपादन करत इतिहास रचताना दिसले.भारतीय क्रीडा क्षेत्रात इतिहास रचणारे ऑलिम्पिकमध्ये आपल्या मेहनतीच्या जोरावर दिमाखात वाटचाल करणारे नीरज चोप्रा यांनी ही आपली कामगिरी उत्तम करून ऑलम्पिक मध्ये तब्बल तेरा वर्षांनंतर पुन्हा एकदा इतिहास रचत भारताने आपले नाव सुवर्णपदकावर कोरले.नीरज चोप्रा ने इतिहास रचत व चमकदार कामगिरी करत भारताला सुवर्णपदकाची कमाई करुन दिली. त्यांनी ८७.५८ मीटर भालाफेक करून सुवर्णपदकाला गवसणी घातली होती. या आधी तब्बल तेरा वर्ष क्रीडा प्रकारात नीरज चोप्रा च्या सुवर्ण कामगिरीने टोकीयो ऑलम्पिक स्पर्धेचा यशवंत ठरले .
नीरज चोप्रा भालाफेक करून ही फेक त्याना सुवर्णपदक जिंकून देणारी ठरली होती.निरज या कामगिरीने विजेता तर झालेच पण त्याचबरोबर सरस कामगिरीची नोंद ऑलम्पिक मध्ये त्यांच्या नावे झाली आहे.
नीरज चोप्रा यांनी या अगोदर आशियाई क्रीडा स्पर्धेमध्ये २०१८ साली सुवर्णपदक मिळवले होते, तर राष्ट्रकुल स्पर्धेत २०१८ मध्ये सुवर्णपदक,आशियाई ॲथलेटिक्स चॅम्पियनशीप २०१७ मध्ये सुवर्णपदक, विश्व अंडर ट्वेंटी एथलेटिक्स चॅम्पियनशिप २०१६ मध्ये सुवर्ण पदक ,दक्षिण आशिया स्पर्धा २०१६ मध्ये सुवर्णपदक, आशियाई ज्युनियर चॅम्पियनशिप २०१६ मध्ये रौप्यपदक, राष्ट्रीय विक्रम ८८.०७ मीटर २०२१ मध्ये तर २०१६ विश्व ज्युनियर विक्रम ८६.४८ मीटरचा असून आतापर्यंत त्यांनी केलेल्या कामगिरीची त्यांच्या नावे नोंद आहे.
त्यांनी नुकत्याच पार पडलेल्या जागतिक अथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेतील कामगिरीने सर्व भारतीयांची मने जिंकली असून त्यांच्याकडून येणाऱ्या स्पर्धेमध्ये अपेक्षाही सर्वांच्या वाढल्या असून त्यांच्यावर या विजयामुळे सर्व स्तरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे या कामगिरीने त्यांनी आपले वेगळे स्थान निर्माण केले असून यामागे त्यांची प्रचंड मेहनत आज कामी आली आहे. त्यांनी केलेल्या कामगिरीमुळे संपूर्ण भारतीय जल्लोष करत असून सर्व क्रीडाप्रेमी उत्साही आहेत.
या कामगिरीबद्दल त्यांचे चाहते क्रीडाप्रेमी,सर्वस्तरातून आज कौतुकाचा वर्षाव या यशामुळे त्यांच्यावर करत आहेत.मी ही त्याचे मनापासून अभिनंदन करतो व पुढील कार्यास शुभेच्छा देतो.
- राहुल मोरे.
बीड.
मो.न.९४०४१८११८१

stay connected