*वनविभागाने बीडसांगवी परिसरातील रानडुकराचा बंदोबस्त करावा:- राजु म्हस्के*

 *वनविभागाने बीडसांगवी परिसरातील रानडुकराचा बंदोबस्त करावा:- राजु म्हस्के*



-----------------------------------------------------------

कडा (प्रतिनिधी) आष्टी तालुक्यातील शेतकरी नेहमी कोणत्या ना कोणत्या संकटाचा सामना करत आहे. तर आता या शेतकऱ्याच्या संकटात भर पडली असून रानडुकरांची दहशत पाहायला मिळत आहे. शेतातील उभ्या पिकांची नासाडी केली जात आहे. ऊस, भुईमूग, मका, डाळिंब,  सोयाबीन, नारळ, आंबा यासह अनेक पिकं नेस्तनाबूत केली जात आहे.

तर दुसरीकडे शेतात काम करणाऱ्या अनेक शेतकऱ्यांवर हल्ले देखील चढवल्याच्या घटना घडत आहेत. यामुळे शेतकरी रानडुकरांच्या दहशतीत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. तालुक्यातील बीडसांगवी ,भवरवाडी, गणगेवाडी,कानसेवाडी, किन्ही बावी, कोहिनी  यासह जवळपास सर्वच तालुक्यात उच्छाद सुरू आहे.

बीडसांगवी  गावात मोठ्या प्रमाणावर रानडुकरांनी दहशत माजवली आहे. बीडसांगवीचे सरपंच माणिक नरवडे यांनी डाळींबाच्या बागेचे नुकसानी पासून सरंक्षण व्हावे म्हणून तार कुंपणला करंट दिला होता त्या कुंपण तारे चिटकून अमोल माणिक नरवडे वय 29 वर्ष या तरुणांचे नुकते दुर्दैवाने मृत्यू झाला आहे यामुळे परिसरातील सर्व शेतकरी खूप दहशती खाली आला असून वन विभागाने लवकरात लवकर या रान डुक्करांचा बंदोबस्त करावा अशी मागणी शिवसंग्रामचे राजु म्हस्के यांनी केली आहे  

विशेष म्हणजे गत काही महिन्यापूर्वी रानडुकरांनी अनेक शेतकर्यावर हल्ले केले आहेत. यामुळे शेतात काम कसं करावं ? शेतात जावं की नाही ? असा प्रश्न त्यांच्यापुढे उभा ठाकला आहे.

तर शेतात देखील रानडुकरांनी धुमाकूळ घातला आहे. पोटच्या मुलाप्रमाणे जपलेल्या ऊसाला, रानडुक्करं भुईसफाट करत आहेत.  या रानडुकरांनी धुमाकूळ घातल्याने ऊस हाताला लागतो की नाही ? असाच प्रश्न शेतकऱ्यापुढे निर्माण झाला आहे.

शेतात पाहणी करत असताना सुद्धा चक्क रानडुकर शेतकऱ्यांचा पाठलाग करीत आहे शेतातील बाजरी, मूग, फळबागा, सोयाबीनमध्ये रानडुकरांनी धुमाकूळ घालत पिकांची नासाडी करीत आहे. यामुळे शासनाने या रानडुकराचा बंदोबस्त करून आम्हाला रानडुक्कर मुक्त करावं, अशी मागणी शिवसंग्रामचे राजु म्हस्के यांनी  केली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

फॉलोअर