खोटा गुन्हा दाखल करून सामाजिक मानसिक बदनामी करणाऱ्या महिलेविरुद्ध कायदेशीर चौकशी होऊन गुन्हा दाखल करणे बाबत जिल्हा पोलीस अधीक्षकांना देवळाली प्रवरा येथील महिलांचे निवेदन,खोट्या गुन्ह्यातून त्वरित नाव वगळावे दलित महासंघाची जिल्हा पोलीस अधीक्षकांना समक्ष भेटून मागणी

 खोटा गुन्हा दाखल करून सामाजिक मानसिक बदनामी करणाऱ्या महिलेविरुद्ध कायदेशीर चौकशी होऊन गुन्हा दाखल करणे बाबत जिल्हा पोलीस अधीक्षकांना देवळाली प्रवरा येथील महिलांचे निवेदन,खोट्या गुन्ह्यातून त्वरित नाव वगळावे दलित महासंघाची जिल्हा पोलीस अधीक्षकांना समक्ष भेटून  मागणी








अहमदनगर प्रतिनिधी:- देवळाली प्रवरा तालुका राहुरी जिल्हा अहमदनगर येथील अर्जदार सविता रवींद्र सरोदे यांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांना दिलेल्या तक्रारी अर्जात  म्हटले आहे की,आम्ही वरील प्रमाणे राहणार देवळाली प्रवरा,तालुका राहुरी जिल्हा अहमदनगर येथील रहिवासी असून माझे पती रवींद्र सरोदे यांच्यावर सदरील महिलेने जो खोटा स्वरूपाचा गुन्हा रजिनं-७०७/२०२२ भादविक ३७६,४५२,३५४,५०६,३४ सह बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण २०१२ चे कलम ४/८/१२ प्रमाणे राहुरी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केलेला आहे.हा गुन्हा पूर्णतःखोटा आहे.सदरील महिला ही आमच्या घराच्या वरच्या मजल्यावर राहते तसेच ही फक्त १६ वर्षाची असून विवाहित आहे व तसेच तिच्या पतीपासून वेगळे राहते व तिचे वर्तन हे अतिशय घाणेरडे स्वरूपाचे असून तिचे व तिच्या पतीचे सातत्याने वाद होतात त्यामुळे सदरील महिला ही पतीपासून विभक्त राहते.सदरील प्रकरणाशी माझ्या पतीचा काहीही संबंध नसून त्यामुळे सदर महिलेविरुद्ध रीतसर गुन्हा दाखल करण्यासाठी आम्ही तक्रार देत आहोत असे निवेदनामध्ये म्हटले आहे.सदरील खोटे गुन्हे दाखल झालेल्या इसमा पैकी रवींद्र सरोदे हे हार्टचे पेशंट असून त्यांना अहमदनगर येथील डॉ.कांडेकर हॉस्पिटल मध्ये ट्रीटमेंट चालू असून जर त्यांच्या जीविताचे काही बरे वाईट झाले तर त्यास सर्वस्वी जबाबदार हे खोटे गुन्हे दाखल करणारी ती महिला राहील,अशा अपप्रवृत्तीच्या व महिलेमुळे कायद्याचा दुरुपयोग होत आहे तसेच अशी वर्तणूक करणाऱ्या महिलेमुळे समाजाचे चांगले नवलौकिक असणाऱ्या व्यक्तींना आत्महत्या करण्याची वेळ येत आहे. तरी सदरील केस मध्ये फिर्याद देणाऱ्या महिलेची सखोल चौकशी होऊन तिच्यावर गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्याची नोंद करावी तसेच जर खोटे गुन्हे मागे घेतले नाही तर आमच्या सर्व गावातील महिला रस्त्यावर उतरतील याची प्रशासनाने नोंद घ्यावी असे सविता सरोदे यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.सदरील निवेदन देता वेळी सविता रवींद्र सरोदे,अॅड.लक्ष्मण बोरूडे जिल्हा कार्याध्यक्ष दलित महासंघ,श्री.संजय चांदणे जिल्हाध्यक्ष दलित महासंघ,मायाताई त्रिभुवन,ज्योती ससाणे,बेबी सरोदे,बाबासाहेब वाल्हेकर,वंदना सरोदे,हिराबाई सरोदे,संजय घोरपडे,शाम खलसे,आशीष घोरपडे,व देवळाली प्रवरा गावातील मोठ्या संख्येने महिला व नागरिकांची निवेदन देता वेळी उपस्थिती होती

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

फॉलोअर