*सरकार मेडीकल अँण्ड जनरल स्टोअर्सचे थाटात उद्घाटन संपन्न*
पाटोदा *(शेख महेशर)*:- पाटोदा शहारातील युवा उद्योजक इलियास सिद्धीकी यांनी क्रांतीनगर भागात सरकार मेडीकल&जनरल स्टोअर्स हा नविन व्यावसाय सुरू केला असुन सदर व्यावसाय क्रांतीनगर भागात करण्याचा उद्देश म्हणजे या भागातील लोकांना औषध, गोळ्या घेण्यासाठी शहरामध्ये यावे लागत असे त्या मुळे त्यांची गैरसोय होऊ नये म्हणुन त्यांनी हा व्यावसाय या भागात सुरू केला आहे. ते जनतेला २४ तास सेवा देणार आहेत, सदर मेडीकलचे आज दि.२९ जुलै २०२२ शुक्रवार रोजी ऑल इंडिया पँथर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दिपक भाई केदार, एमआयएमचे जिल्हा अध्यक्ष शेख शफीक भाऊ, एएसएफचे राष्ट्रीय अध्यक्ष पंकज भाई चव्हाण, यांच्या हस्ते उद्घाटन झाले. या वेळी पाटोदा शहरातील राजकीय, सामाजिक नेते मंडळी, व्यापारी, डॉक्टर, मेडीकल असोशियनचे पदाधिकारी हजर होते. आलेल्या सर्व मान्यवराचे आभार कॉंग्रेसचे शहर अध्यक्ष इम्रानभाई शेख यांनी सर्वाचे आभार मानले. असून सरकार मेडीकल अँण्ड जनरल स्टोअर्स मुळे पाटोदा शहराच्या वैभवात वाढ झाली व सरकार मेडीकल मुळे जुना पाटोदा म्हणजे क्रांतीनगर, जयसिंगनगर व इतर भागातील नागरिकांना जवळ आणी अतिशय योग्य दरात चांगली सुविधा मिळणार असल्याने ह्या भागातील नागरिक सरकार मेडीकल चे मालक इलियास सिद्धीकी यांच्या निर्णयावर खुप समाधानी झाले आहेत.


stay connected