सर्वोच्च न्यायालयाने ओबीसीला दिलेले आरक्षण हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाचा विजय आहे -- माधव दादा जमदाडे # लोहा येथे रिपब्लिकन सेनेच्या कार्यकर्त्यांचा मेळावा व अनेकांचा पक्ष प्रवेश#

 सर्वोच्च न्यायालयाने ओबीसीला दिलेले आरक्षण हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाचा विजय आहे -- माधव दादा जमदाडे 
# लोहा येथे रिपब्लिकन सेनेच्या कार्यकर्त्यांचा मेळावा व अनेकांचा पक्ष प्रवेश#

----------------------------------------



लोहा/प्रतिनिधी

सर्वोच्च न्यायालयाने नुकतेच ओबीसी समाजाला स्थानिक स्वराज्य संस्थेत आरक्षण दिले असून हे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाचा विजय आहे असे प्रतिपादन रिपब्लिकन सेनेचे मराठवाडा अध्यक्ष माधव दादा जमदाडे यांनी लोहा येथे रिपब्लिकन सेनेच्या कार्यकर्त्यांचा मेळावा व अनेकांचा पक्ष प्रवेश या कार्यक्रमात केले.

 लोहा येथील शासकीय विश्रामगृहात दि.२६ जुलै रोजी रिपब्लिकन सेनेचे सरसेनानी आनंदराज आंबेडकर यांच्या आदेशानुसार पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी प्रत्येक  जिल्ह्यात, तालुक्यात रिपब्लिकन सेनेचा प्रचार प्रसार शाखा स्थापना कार्यक्रम चालू असुन यात लोहा जि.नांदेड येथील रिपब्लिकन सेनेच्या पदाधिकाऱ्यांच्या निवडी करून अनेक पक्षातील अनेक कार्यकर्त्यांनी रिपब्लिकन सेनेत प्रवेश करण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

 यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रिपब्लिकन सेनेचे मराठवाडा अध्यक्ष माधवदादा जमदाडे होते तर प्रमुख उपस्थिती मराठवाडा उपाध्यक्ष मधुकरराव झगडे, मराठवाडा सदस्य अनिलदादा गायकवाड,,वंचित आघाडीचे नेते के. एच. वन्ने,  नांदेड दक्षिण जिल्हाउपाध्यक्ष प्रदिपभाऊ मगरे,अॅटो युनियनचे जिल्हाध्यक्ष विलास मगरे,महीला आघाडीच्या जिल्हामहासचिव अनिता इंगळे,महीला आघाडी नांदेड शहराध्यक्षा लत्ताताई सोनकांबळे, महीला आघाडी तालुकाध्यक्षा शांताताई लांडगे, गोळेगाव ग्रा.पं.च्या सरपंच गायकवाडबाई, लोहा तालुकाध्यक्ष सुनिल बोईनवाड, सामाजिक कार्यकर्ते भैय्यासाहेब गोडबोले,शिराढोण सर्कलप्रमुख महेबुब शेख,आदी उपस्थित होते.

 यावेळी लोहा तालुक्यातील रिपब्लिकन सेनेच्या पदाधिकाऱ्यांच्या निवडी पुढीलप्रमाणे करण्यात आल्या आहेत शोशलमीडीया तालुकाध्यक्षपदी चंद्रकांत चौकटे,तालुका उपाध्यक्षपदी गोविंद गायकवाड,तालुका सहसंघटकपदी सखाराम सोनसळे,कलबर शाखा अध्यक्षपदी विकास सोनसळे, तालुका संघटकपदी उध्दव सोनसळे, कलंबर सर्कल उपाध्यक्षपदी जयदीप सोनसळे, तालुका उपाध्यक्षपदी अक्षय सोनसळे, तालुका सहसचिवपदी जितेंद्र हनवते, तालुका उपाध्यक्षपदी सखाराम सोनवणे,दक्षिण जिल्हाउपाध्यक्षपदी अश्विन गर्दनमारे आदींची निवड करुन मान्यवरांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आले. यावेळी अनिल जोंधळे,बाबाराव सोनकांबळे,बालाजी सोनकांबळे,रमाबाई चंदनशिवे,गोविंद गायकवाड,आनदा गोमस्कर,बालाजी गोमस्कर,शेषराव गोमस्कर, अनिल सोनसळे  यांच्यासह असंख्य कार्यकर्ते रिपब्लिकन सेनेच्या महत्वपुर्ण बैठकीस उपस्थीत होतो.या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन व आभार भैय्यासाहेब गोडबोले यांनी मानले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

फॉलोअर