रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (ए) जि.प,पं.स. स्वबळावर लढवणार - कैलास जोगदंड पांगुळगव्हाण येथे रिपाइं ए शाखेचे राज्य संघटक जोगदंड यांच्या हस्ते उद्घाटन

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (ए) जि.प,पं.स. स्वबळावर लढवणार -  कैलास जोगदंड 
पांगुळगव्हाण येथे रिपाइं ए शाखेचे राज्य संघटक जोगदंड यांच्या हस्ते उद्घाटन



आष्टी। ए बी कदम 

तालुक्यात गावागावात शाखा तयार करुन घर तेथे कार्यकर्ता तयार करुन आगामी काळात होऊ घातलेल्या जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक रिपब्लिकन पार्टी ऑफ  इंडिया स्वबळावर लढवणार आहे.तशी पक्षाच्या वतीने मोर्चेबांधणी पूर्ण झाली असून कार्यकर्तांना निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर तयारीला लागण्याचे सूचना राज्य प्रदेश संघटक कैलासभाऊ जोगदंड यांनी दिल्या आहेत.ते पांगुळगव्हाण येथे रविवार दि.३१ जुलै रोजी मोैजे रिपब्लिकन पार्टी ऑफ  इंडिया( A) पक्षाच्या शाखेचे उदघाटन राज्य संघटक कैलासभाऊ जोगदंड  यांच्या हस्ते करण्यात आले.यावेऴी पक्षाचे तालुक्यातील पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या समवेत पाटीचे अनावरन केले याप्रसंगी ते बोलत होते.पुढे बोलताना म्हणाले की पक्षाच्या कार्यकर्त्यांनी गावोगावी शाखा तयार कराव्यात , घर तेथे कार्यकर्ते तयार करावेत दिपक  भाऊ निकाळजे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने नविन उपक्रम "चले सत्ता की अोर"व सक्रिय सदस्य नोंदणी अभियान हे  सुरु केले असल्याचे सांगितले.तसेच लवकरात लवकर मा.राष्ट्रीय अध्यक्ष दिपक निकाळजे यांचा तालुक्यात दौरा व मोठी  सभा घेतली जानार  आसल्याचे  कैलास जोगदंड यांनी  निश्चित केले.त्याचबरोबर राष्ट्रीय अध्यक्ष दिपक भाऊ निकाळजे यांच्या आदेशाने आष्टी तालुक्यामध्ये होना-या पंचायत समिती आणि  जिल्हा परिषद निवडणुका रिपब्लिकन पार्टि आॅफ इंडिया स्वबळावर लढणार असे कैलास भाऊ जोगदंड ( राज्य संघटक)यांनी जाहीर सांगितले  यावेळी उपस्थित तालुकाध्यक्ष  दिलीप थोरात ,शहराध्यक्ष विनोद निकाळजे , उपाध्यक्ष हनुमंत बनसोडे,पाटोदा तालुका अध्यक्ष सुखदेव उबाळे ,उपाध्यक्ष गोरख गजघाट, शहर उपाध्यक्ष अजय निकाळजे, सचिव सागर ससाने, कार्याध्यक्ष दिपक जोगदंड, शाखा अध्यक्ष रुशिकेश थोरात,विकास थोरात, अजय लोंढे, अमोल थोरात, केेैलास जोगदंड, निखिल ससाने, कुलदिप काळे व तालुक्यातील कार्यकर्ते उपस्थित होते .


आगामी काळात जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक रिपाइं ए गट तयारीनिशी मैदानात उतरणार असून तालुक्या मधील मुर्शदपूर जिल्हा परिषद गट व ब्रम्हगाव पंचायत समिती गण एस.सी साठी राखीव जागेवर उमेदवार उभा करणार.
   कैलास जोगदंड - राज्य संघटक

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

फॉलोअर