पवित्र श्रावण महिना संपेपर्यंत मांसाहार करणार नाही - समीर शेख
आष्टी तालुक्यातील सांगवी पाटण येथील युवक समीर शेख यांनी दिला सर्वधर्मसमभाव चा संदेश
हिंदू धर्मात पवित्र मानल्या गेलेल्या मराठी महिण्यामधी श्रावण हा महिना सर्वोच्च पवित्र मानला जातो, या काळामध्ये अनेक व्रत वैफल्य, उपवास, केले जातात,तसेच या महिन्यात जास्तीत जास्त सण वार उत्सव असतात,तसेच या महिन्यांमध्ये शंभू महादेवाची उपासना केली जाते, अनेक यात्रा उत्सव , गावोगावी हरिनाम सप्ताह असतात, मी या सर्व हिंदू बांधवात वर्षभर मिळून मिसळून राहणारा युवक असल्यामुळे , सामजिक सौख्य एकोपा सामाजिक बांधिलकी टिकून राहावी म्हणून मी या महिन्यांमध्ये मांसाहार वर्ज्य करणार आहे, त्यांचे असे मत आहे हिंदु बांधवांचे मुस्लिम बांधव हे लहान बंधू आहेत, त्यांमुळे सर्व धर्माचा आदर केलाच पाहिजे, वर्ष भर आपण एकत्र राहतोत, भारत देशा मध्ये सर्व जाती धर्माचे लोक गुण्या गोविंदाने राहतात म्हणून 1 महिना मांसाहार न करण्याचा निर्णय घेतला आहे, काही दिवसापूर्वी हिंदु धर्माची सर्वात मोठी आषाढी एकादशी व बकरी ईद ऐकाच दिवशी आली होती त्यामुळे समीर शेख कसल्याही प्रकारचा बळी देता बकरी ईद साजरी केली होती. सर्व धर्म समभाव चा संदेश दिला होता तसेच आपले आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती निमित्त नऊ वर्षापासून शिवनेरी ते सांगवी पायी ज्योत घेउन येत आहे. त्यामूळे महाराष्ट्र मधी शिवरायांचा मुस्लिम मावळा म्हणुन ओळख आहे,तसेच फ्फसांगवी पाटण गावामध्ये जागृत देवस्थान भैरवनाथाचे मंदिर आहे त्यांची जयंती मोठ्या मध्ये साजरी करतात त्या निमित्त काशी (उत्तरप्रदेश) येथून 5 वर्षांपासून समीर शेख हा गंगाजल आणत आहे, शिवजयंती,पारायण, गणेशोत्सव, सर्व त्योहार मध्ये सहभाग असतो. त्याचं असं म्हणणे आहे की सगळ्यांचा देव एकच आहे फक्त प्राथना करण्याची पद्धत वेगवेगळी आहे , आणि आत्ता हिंदू धर्माचा पवित्र श्रावण महिना सुरू झाला आहे म्हणून 1 महिना मांसाहार करणार नाही असा निर्णय घेतला आहे त्यामुळे समीर शेख यां निर्णयाचे सर्वत्र कौतुक होत आहे..



stay connected