*स्वतंत्र भारताचा मातंग समाज*

 *स्वतंत्र भारताचा मातंग समाज*



               भारत देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष साजरे करताना आनंद द्विगुणक होतो त्यात शंकाच नाही परंतु दुसरीकडे भारत देशातील दलितांच्या अवस्था आजही आपण पहिल्या तर त्यांना स्वातंत्र्य मिळाले पण त्यांचे दारिद्र्य काही गेलेले आपणास पहावयाला मिळत नसताना दिसते.ही एक खूप मोठी शोकांतिकाच म्हणावी लागेल त्यात अनु जाती अनु जमातीतील लोकांसाठी स्वातंत्र्योत्तर उन्नतीच्या संधी मिळाल्या नाही असेही म्हणता येणार नाही.डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी आपणाला घटनेमध्ये मागास प्रवर्गांना उन्नतीच्या प्रगतीच्या अनेक संध्या उपलब्ध करून दिल्या आहेतच पण त्यातही मागासवर्गीय दलित समाजातील स्वतःला उच्च समजल्या जाणाऱ्या लोकांनी या सर्व संधी स्वतःच्या पदरात पाडून घेतल्या त्यात मातंग समाजातील  स्वयंभू पुढार्‍यांचा समावेश नाकारता येणार नाही.स्वातंत्र्योत्तर काळात मातंग समाजाची स्थिती पाहिली तर बराचसा मातंग समाज आजही दोन वेळच्या भाकरीसाठी काबाडकष्ट करताना दिसतो आहे.शिक्षणाबद्दलची अनास्था, आर्थिक परिस्थिती दयनीय, आरोग्याबाबत विचार केला तर कष्ट खूप करतात परंतु आरोग्याची काळजी कमी घेताना पाहायला मिळते,व्यसनाधीनता अंधश्रद्धा,रूढी,परंपरेत गुंतलेला समाज,संघटन क्षमतेचा विकास नाही,समाजातील दर्जा हा परिणामकारक उल्लेखनीय असा नाही इत्यादी अनेक घटकांची परिस्थिती आपणास या निमित्ताने पाहता येईल.

        शिक्षणाबद्दलची अनास्था:-  शिक्षणाच्या संध्या स्वातंत्र्योत्तर भारतात मातंग समाजाला अनु जातीच्या आरक्षणातून भरपूर घेता आल्या असत्या परंतु शिक्षणाचे महत्त्व काय आहे हे समाजाला माहित नव्हते म्हणून मातंग समाजातील तरुण शिक्षणापासून वंचित राहिलेला आपणास पहावयाला मिळतो आजची परिस्थिती पाहता तर बऱ्याच पैकी मातंग समाज शिक्षणाकडे वळलेला पाहायला मिळतो.काही पदावर मातंग अधिकारी कर्मचारी आहेत पण त्यांचे प्रमाण खूपच कमी आहे. हळूहळू ते प्रमाणही वाढेल खेड्यापाड्यात मातंग समाज आजही रूढी परंपरेच्या विळख्यातून बाहेर निघालेला नाही.हे समाज खच्चीकरणाचे खूप मोठे कारण आहे.मातंग समाजातील नोकरदार,सामाजिक कार्यकर्ते,अधिकारी वर्ग आहे यांनी मातंग समाजाच्या खेड्यापाड्यातील मुलांना शिक्षणाच्या संध्या कशा प्रकारे जास्तीत जास्त उपलब्ध करून देता येतील यासाठी कार्य करावे लागणार आहे.त्यासाठी मातंग समाजातील मुल स्पर्धा परीक्षेकडे कसे वळतील हे पाहून त्यांना मार्गदर्शन करावे लागेल.त्यांना शिक्षणाबद्दलची आवड निर्माण कशी होईल ते पहावे लागेल.यासाठी शिक्षणाचे महत्त्व पटवून द्यावे लागेल असे कार्य केल्यावरच त्याची शिक्षणाबद्दलची अनास्था दूर होण्यास मदत होईल व शिक्षण घेण्यासाठी पालक मुलांना शाळेमध्ये पाठवतील तरच समाजाची प्रगती होणे शक्य होईल.

  आर्थिक परिस्थिती व सामाजिक दर्जा मातंग समाजाची आजची आर्थिक परिस्थिती पाहता जो समाजातील कर्मचारी वर्ग, व्यवसायिक,राजकीय वर्ग आहे त्यांची किमान घरे,दारे आणि थोडीफार प्रमाणात जमीन काही प्रमाणात आर्थिक परिस्थिती सुधारताना आजच्या स्थितीत आपणाला पाहायला मिळत आहे.त्यांच्या मुलांना शिक्षणाच्या  चांगल्या संधी उपलब्ध करून देत आहेत.त्यांची आर्थिक परिस्थिती थोडीफार सुधारलेली आहे.त्यांना समाजात दर्जा मिळतो सन्मान मिळतो परंतु शेवटी कितीही दर्जा सन्मान मिळाला तरीही दलितांविषयीची भावना समाजा मधली कोणी बदलू शकत नाही हे वास्तव सत्य कोणीच नाकारू शकत नाही.आणि या भावना अजून जास्त प्रखरतेने समोर येत आहेत 

    राजकीय विषय पाहता मातंग समाजातील अनेक संघटना पुढारी आहेत त्याच्यासाठी अनेक मातंग समाजातील युवक आपल्या आयुष्याचा खूप महत्त्वाचा वेळ त्या पुढार्‍यांच्या पाठीमागे घालवितांना दिसतात अनेक संघटनांना निर्माण होण्याची कारणे पाहता समाजातील छोटे मोठे पुढारी स्वतःला खूप मोठा किंवा महाराष्ट्र राज्य पातळीवरचा नेता असल्यासारखे समाजात सर्रास वावरताना दिसतात ही परिस्थिती वास्तविक परिस्थिती आहे ही नाकारता येणार नाही यात परिवर्तन होण्याची अत्यंत गरज आहे समाज संघटित झाल्याशिवाय त्याची किंमतही वाढत नसते जे काम एकत्र येऊन करण्यात किंमत मिळेल ती असंघटित किंवा वेगवेगळ्या संघटनांच्या माध्यमातून कधीच मिळणार नाही संपूर्ण समाज एका छताखाली आला तरच काही राजकीय संधी पुढे चालून समाजाला मिळू शकेल अशी आजची परिस्थिती आहे .



      रुढी परंपरा :-

        मातंग समाज आजही स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्षानंतरही रुढी परंपरेत गुंतलेला दिसतो आहे आज मी जेव्हा तरुण मुलांना केस वाढवलेले अवस्थेत पाहतो तर खूप वेदना होतात त्या पोतराजाच्या वेशात तरुण मुलं हौसेने फोटो काढतात ते फोटो शेअर करतात किती हा रूढी,परंपरेचा पगडा आहे.कधी दूर होईल यांची ही स्थिती शिक्षणाच्या नावाने बोंबाबोब पण सण उत्सव आला की एखाद्या  लग्नातला नवरदेव जसा नटतो तसा पोतराजाचा पोशाक परिधान करून तरुण मुलं नटताना मी पाहीली आहेत त्यांना पाहून खंत वाटते शिक्षणाचे महत्त्व त्यांना कळालं असतं पण यांचे आई-वडील उच्च शिक्षित झाले असते तर कदाचित यांची परिस्थिती ही आज वेगळी दिसली असते रुढी परंपरेच्या विळख्यातून समाजाला बाहेर काढणे अत्यंत आवश्यक आहे त्यावर एकमेव उपाय म्हणजे "शिक्षण"शिक्षणाच्या प्रवाहात आल्याशिवाय तरुण मुलं या रूढी परंपरेच्या बाहेर येऊन जगणार नाहीत हे मात्र खरे आहे.आज अण्णाभाऊ साठे यांची जयंती या निमित्ताने माझ्या तमाम मातंग समाजाला हार्दिक हार्दिक शुभेच्छा..



प्रा.महेंद्र बन्सीधर वैरागे  ॲड.बी.डी.हंबर्डे महाविद्यालय, आष्टी समाजशास्त्र विभाग



*(शब्दांकन:-पत्रकार अण्णासाहेब साबळे आष्टी)*

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

फॉलोअर