थेरला पंचायत समिती गणात भारतीय जनता पार्टी कडून किरण बांगर यांच्या नावाची जोरदार चर्चा

 थेरला पंचायत समिती गणात भारतीय जनता पार्टी कडून किरण बांगर यांच्या नावाची जोरदार चर्चा



-------------
पाटोदा(प्रतिनिधी): बीड जिल्ह्यातील पंचायत समिती जिल्हा परिषदेच्या निवडणूकांसाठीच्या आरक्षणाच्या सोडती नुकत्याच जाहीर झाल्या असल्यामुळे पाटोदा तालुक्यातील मुख्य समजला जाणारा थेरला पंचायत समिती गण मधून भारतीय जनता पार्टी चे नेते किरण बांगर यांच्या पत्नी यांचे नाव उमेदवारीसाठी आघाडीवर दिसत आहे.अशी चर्चा गावोगावी सुरू झाली आहे.भारतीय जनता पार्टी ला मानणारा वर्ग ह्या गणात प्रामुख्याने पाहायला मिळतो आणि किरण बांगर यांच्या पत्नी जयश्री किरण बांगर ह्या पाटोदा पंचायत समिती सभापती देखील होत्या त्यामुळे बांगर यांना उमेदवारी मिळण्याची दाट शक्यता असल्याचे स्थानिक सूत्रांकडून समजते.दरम्यान जिल्हा परिषदेला तांबाराजुरी गटातून कोणाला उमेदवारी देण्यात येईल यावर आणखी देखील स्पष्टीकरण नाही.
पाटोदा तालुक्यातील थेरला पंचायत समिती गणात भायाळा,थेरला,वाघिरा,मेंगडेवाडी,वैद्यकिन्ही,सोने-सावरगाव,बेनसुर,रामवाडी,घटवाडी,सोनेगाव,सौंदाना ही गावे आहेत.तर या गणासाठी (सर्वसाधारण-स्त्री) अशी आरक्षणाची सोडत जाहीर झालेली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

फॉलोअर