*येडेश्वरी साखर कारखान्याची पश्चिम महाराष्ट्रात एन्ट्री* *आर्यन शुगर साखर कारखाना घेतला विकत*

 *येडेश्वरी साखर कारखान्याची पश्चिम महाराष्ट्रात एन्ट्री* 
*आर्यन शुगर साखर कारखाना घेतला विकत* 




केज( प्रतिनिधी ) -  १० वर्षापूर्वी लावलेले येडेश्वरी ॲग्रो प्रोडक्ट्स नावाच्या रोपट्याचे वटवृक्षात रुपांतर करण्याचा उद्देश बाळगुन कारखान्याचे सर्वेसर्वा बजरंग सोनवणे वाटचाल करत आहेत. त्याचाच एक भाग आज पुर्ण झाला आर्यन शुगर, खामगाव ता. बार्शी साखर कारखाना येडेश्वरी ॲग्रो प्रोडक्ट्स ने खरेदी करत कारखान्याचा ताबा घेतला.येडेश्वरी साखर कारखान्याप्रमाणे आर्यन साखर कारखान्याचा कारभार चोखपणे हाकत ऊस उत्पादक शेतकरी, कारखाना कर्मचारी, ऊसतोड कामगार, वाहन चालक मालकांचे हित जपण्याचे काम आम्ही करणार आहोत असे सोनवणे यांनी म्हटले आहे. 

हा कारखाना विकत घेऊन सोनवणे यांनी पश्चिम महाराष्ट्रात एन्ट्री घेतली आहे. त्यामुळे या कारखान्यास गाळपासाठी ऊस घालणाऱ्या शेतकऱ्यास ऊस बिलाबाबत भविष्यात निश्‍चित राहावे लागणार आहे. कारखान्यावर अवलंबून असणाऱ्या अनेक कामगारांने भविष्य चेअरमन बजरंग सोनवणे  यांच्या धाडसी निर्णयामुळे उज्वल ठरणार आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

फॉलोअर