आषाढी महीन्यात आज मंगळवारी लखाई च्या मंदीरात बकरे कोबडे, यांचा दिला बळी..

आषाढी महीन्यात आज मंगळवारी लखाई च्या मंदीरात बकरे कोबडे, यांचा दिला बळी.. 




आष्टी प्रतिनिधी- शरद रेडेकर-- सालाबाद प्रमाणे याही वर्षी आषाढी महिन्यामध्ये सर्वत्र गावागावांमध्ये लखाईची यात्रा साजरी होते . आज देखील आष्टी तालुक्यामध्ये तसेच आष्टी शहरातील लखाईच्या मंदिरात भाविक भक्तांनी आपले नवस फेडत भाविक भक्त लोकांनी आषाढी जत्रा साजरी केली. त्यामध्ये आज जवळपास वीस बकरे व 50 कोंबडी यांचा बळी चढवण्यात आला. आज मंगळवारी भाविकांनी मोठ्या प्रमाणावर  लखाईच्या मंदिरात दर्शनासाठी गर्दी केली होती. मंदिराकडे जाण्यासाठी रस्ता नसल्याने भाविकांना अडचणीला सामोरे जावे लागले . त्यामुळे भाविक भक्तांनी नगरपंचायत च्या माध्यमातून आमदार सुरेश आण्णा धस यांनी या मंदिरे कडे जाण्यासाठी रस्ता उपलब्ध करून द्यावा अशी मागणी केली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

फॉलोअर