आ.आजबे यांच्या प्रयत्नातून गावागावात विकास कामे सुरू --युवा नेते महेश आजबे

 आ.आजबे यांच्या प्रयत्नातून  गावागावात विकास कामे सुरू --युवा नेते महेश आजबे



 आष्टी प्रतिनिधी 

आष्टी पाटोदा शिरूर मतदारसंघाचे कर्तव्यदक्ष आमदार बाळासाहेब आजबे काका यांच्या माध्यमातून मतदारसंघात मोठ्या प्रमाणावर विकास कामे मंजूर झाले असून आज मतदारसंघातील प्रत्येक गावामध्ये आमदार बाळासाहेब आजबे यांच्या प्रयत्नतुन मंजूर झालेले विकास कामे सुरू आहेत विकास कामे व जनतेचे प्रश्न सोडवणे हेच मुख्य ध्येय असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे युवा नेते महेश भैय्या आजबे यांनी सांगितले. 

आष्टी तालुक्यातील मांडवा येथे आमदार बाळासाहेब आजबे काका यांच्या प्रयत्नातून मंजूर झालेल्या मांडवा ते कडा कारखाना या रस्त्याचे मजबुतीकरण दहा लक्ष रुपये व दलित वस्ती येथे सिमेंट रस्ता पाच लाख रुपये अशा एकूण 15 लक्ष रुपये किमतीच्या विकास कामांचा शुभारंभ युवा नेते महेश आजबे यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी युवा नेते अशोक अण्णा पोकळे विजुभाऊ मुटकुळे ताराचंद कानडे सरपंच अशोक मुटकुळे उपसरपंच युवराज मुटकुळे रोहितराजे निंबाळकर,योगेश मुटकुळे नगरसेवक नाजीम भाई शेख प्रशांत मुटकुले अनिल मुटकुळे अंकुश मुटकुळे माजी सरपंच सिताराम मुटकुळे योगीनाथ मुटकुळे रामेश्वर मुटकुळे बद्रीनाथ मुटकुळे प्रकाश श्रीखंडे तेजस श्रीखंडे लक्ष्मीकांत मुटकुळे, लक्ष्मण जाधव  विजय मुटकुळे धुमाळ संतोष  मुटकुळे यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

फॉलोअर