मैत्री कट्टा कवी मनाचा साहित्य समूहाचे ऑनलाइन कार्यक्रम संपन्न

 मैत्री कट्टा कवी मनाचा साहित्य समूहाचे ऑनलाइन कार्यक्रम संपन्न



प्रत्येक कवी कवयित्रींना प्रोत्साहित करणे , त्यांच्याकडून नवीन नवीन उपक्रम करून घेणे, कविता शिकवणे असे या समूहाचे कार्य आहे अतिशय सुंदर असे प्रस्ताविक भाषण कवयित्री कृष्णप्रिया यांनी केले त्या नेहमी कार्यशील असतात अतिशय प्रभावी सूत्रसंचालन अलका शहारे मॅडम यांनी केले यामध्ये गझल देखील सादर करण्यात आली समूहाचे संचालक माननीय वीर देसाई यांनी गझल व काळजावरची कविता सादर केली जगदीश चव्हाण यांच्या ही कविता वास्तववादी व अप्रतिम होत्या अविनाश खरे यांनी वास्तववादी सुंदर रचना सादर केली नवीन आलेले सदस्य माननीय सोनागाते सर यांनी सुंदर विविध रचना सादर केल्या प्रिया, वैशाली यांनी सुंदर कविता सादर केल्या. स्मिता ,मृणाली, माला, सुवर्णालता, मेहमुदा ....भणगे यांनी अप्रतिम कविता सादर केल्या संतोष चंदगिरी यांनी काव्य गायन करून वातावरण एकदम प्रसन्न केले प्रा. प्रदीप कदम यांची कविता ही दर्जेदार होती सगळेजण एकमेकांना खूप छान कवितेला दाद देत होते यातूनच या समूहामध्ये एकीपणा दिसून येतो.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

फॉलोअर