बीडसांगवी येथील तरुण शेतकरी अमोल नरवडे याचा विजेच्या धक्क्याने मृत्यू बीड सांगवी गावावर शोककळा....

 बीडसांगवी येथील तरुण शेतकरी अमोल नरवडे याचा विजेच्या  धक्क्याने मृत्यू बीड सांगवी गावावर शोककळा....



आष्टी प्रतिनिधी बीड सांगवी गावचे सरपंच माणिक काका नरोडे यांचे चिरंजीव अमोल नरवडे हे आज सकाळी आपल्या शेतामध्ये डाळिंबाच्या बागेमध्ये डाळिंब बागेत गेला असता    त्यांना त्या ठिकाणी विहिरी जवळ उघड्या    वायरवर पाय पडला असताना त्यांना तीव्र विजेचा शॉक लागून त्यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे बीडसांगवी गावावर शोककळा पसरली आहे. अमोल नरवडे हे मेहनती व तरुण शेतकरी बीड सांगवी गावामध्ये डाळिंब बागेच्या शेतीमध्ये त्यांनी मोठे उत्पन्न काढून हे चांगल्या प्रकारे नाव मिळवले होते. अशा होतकरू तरुण शेतकऱ्याचा असा दुर्दैवी मृत्यू झाल्याने गावामध्ये  शोककळा पसरली. त्याच्यावर आज दुपारी बीड सांगवी गावामध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी जि प चे माजी अध्यक्ष विजय गोल्हार,माजी उपसभापती आदिनाथ सानप, दुध संघाचे व्हाइस चेअरमन आत्माराम फुंदे, रावसाहेब लोखंडे,सडे सोयरे व्यापारी मित्र परिवार मोठ्या संख्येने उपस्थित होता..एक मेहनती होतकरू मुलगा गेल्याने सरपंच मानिक नरवडे यांच्या वर दुःखाचा डोंगर कोसळला आहे..

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

फॉलोअर