*जोशिसांगवी ते तेलंगवाडी या रस्त्यावरील पुल तुटल्याने प्रवाशांचे हाल* *रिपब्लीकन सेना आंदोलनाच्या पावित्र्यात*

 *जोशिसांगवी ते तेलंगवाडी  या रस्त्यावरील  पुल तुटल्याने प्रवाशांचे हाल*
*रिपब्लीकन सेना आंदोलनाच्या पावित्र्यात*




नांदेड (प्रतिनिधी - प्रदिप मगरे ) - लोहा तालुक्यातील जोशिसांगवी ते तेलंगवाडी  या रस्त्यावरील  पुल तुटल्यामुळे अनेक गावांचा संपर्क तुटला आहे .तरी नागरीकांना  पुल तुटल्यामुळे पुलावरुन येणे जाणे साठी मोठी कसरत करावी लागते .   वाहतुकिला वळुन जावे लागते .

 जोशिसांगवी ते उस्माननगर पुलावरुन विद्यार्थ्यांना साईकल व पायी जान्याकरीता त्रास सहन लागतो.  पुल तुटल्यामुळे पाच  किलो मिटर वळुन जावे लागते . गेल्या दोन वर्षांपासून  सतत  नागरीकाना त्रास सहन करावा लागतो .आनेक दिवसापासुन संबंधीत अधिकारी व  राजकीय पुढार्यांना सांगुन सुद्धा त्या पुलाकडे सर्वांचेच दुर्लक्ष का होत आहे ? असा प्रश्न सामान्य जनतेला पडला आहे . लोहा तालुक्याला लोकप्रतिनिधी आहेत कि नाही ? असा प्रश्न निर्माण होत आहे . लोक प्रतिनिधींनी त्वरीत या प्रश्नी  लक्ष द्यावे अन्यथा  रिपब्लिकन सेना रस्त्यावर उतरुन आंदोलन करील असा इशारा  रिपब्लिकन सेना नांदेड दक्षीण जिल्हाउपाध्यक्ष प्रदीपभाऊ मगरे , विलास मगरे ,बाळु गजभारे , अमोल जाधव , अश्विन गरर्दनमारे सामाजीक कार्यकर्ते यांनी दिला .

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

फॉलोअर