सोमवार पासून पहीली ते बारावीची शाळा होणार सुरू
-------------------------------------
सोमवार दि.24 जानेवारी पासून आष्टी तालुक्यातील पहीली ते बारावी पर्यंतची शाळा सुरू होणार असल्याची माहिती गटशिक्षणाधिकारी सुधाकर यादव यांनी दिली आहे.
राज्य भरामध्ये कोरोणाचे संकट होते.परंतू विद्यार्थी शिक्षणापासून दूर होत असल्याने विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे.त्यामुळे आज मंत्रीमंडळात बैठक झाली असून यामध्ये सोमवार दिनांक 24 तारखेपासून आष्टी तालुक्यातील शाळा सुरू होणार असल्याची माहिती गटशिक्षणाधिकारी सुधाकर यादव यांनी तेजवार्ताशी बोलताना सांगितले आहे.
यावेळी त्यांनी सांगितले की, वरीष्ठ पातळीवरून जो निर्णय येईल त्या प्रमाणे आम्ही शाळा सुरू करण्यास तयार अहोत असेही यादव यांनी सांगितले.
तेजवर्ता प्रतिनिधी संदिप जाधव आष्टी
stay connected