अंबरनाथमध्ये बर्निंग ट्रकचा थरार... गंधकाने भरलेल्या चालत्या ट्रकने घेतला पेट..

 अंबरनाथमध्ये बर्निंग ट्रकचा थरार...

गंधकाने भरलेल्या चालत्या ट्रकने घेतला पेट..

प्रतिनिधी : संजय पंडित



दि.१९ ठाणे(अंबरनाथ) : आनंदनगर एमआयडीसी मधून गंधकाने भरलेला ट्रक अचानक पेटल्याने मोठा अपघात घडला. ट्रक पडल्याचे लक्षात येताच चालकाने ट्रक तसाच सोडून पळ काढल्याने हा ट्रक रिव्हर्समध्ये आला आणि  मागून येणाऱ्या रिक्षाला धडक दिली. यात रिक्षातील दोघांना भाजून गंभीर दुखापत झाली आहे. रिक्षात बसलेले वासुदेव भोईर आणि गुलाबबाई भोईर यांचा मृत्यू झाला आहे.         

अंबरनाथहून काटई नाका दिशेने जाणारा गंधकाने भरलेला ट्रक आनंद नगर पोलीस चौकी समोरून जात असताना या ट्रकमधील काही गंधकाच्या गोण्या ट्रकमधून खाली पेटलेल्या अवस्थेत पडल्या. चढणीवर हा सर्व प्रकार घडल्याने ट्रकमधील गंधकाने देखील पेड घेतला. याची कल्पना ट्रकचालकाला येताच चढणीवरच्या ट्रक चालकाने ट्रक सोडून देत पळ काढला. त्यामुळे गंधकाने भरलेला ट्रक पेटलेल्या अवस्थेत तसाच मागे सरकला. याचवेळी मागून येणार्‍या एका रिक्षाला त्याची धडक लागली आणि रिक्षाने देखील पेट घेतला. या अपघातात रिक्षामधील दोघे जण गंभीर जखमी झाले असून त्यांची प्रकृती अंत्यअवस्थेत असल्याचे स्थानिकांनी स्पष्ट केले आहे. या अपघाताची माहिती मिळताच आनंदनगर एमआयडीसीतील अग्निशामक दल आणि अंबरनाथ नगरपालिकेच्या अग्निशामक दलाने ही आग आटोक्यात आणली असून आनंदनगर पोलीस पुढील तपास करीत आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.