कोरोनाची तिसरी लाट रोखण्यासाठी टाकळसिंग प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत साथरोग सर्वेक्षण मोहीम
—————————————————————
आष्टी शहरासह चाळीस गावांचा समावेश,पासष्ट हजार नागरीकांची होणार तपासणी-डाॅ.नितीन मोरे
————————————————————
आष्टी(प्रतिनिधी)-गेल्या काहि दिवसात तालुक्यात ताप,सर्दी,खोकला या आजारांची लागण नागरीकांना मोठ्या प्रमाणात सुरू आहे.त्यावर उपचार न घेता नागरीक हे दुखणे किरकोळ म्हणून अंगावरच काढत आहेत.त्यामुळे टाकळसिंग प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत सात उपकेंद्र असून 65 हजार लोकसंख्या असून,या सर्वांची आरोग्यकेंद्रामार्फत साथ रोगांची माहिती सांगून,काळजी कशी घ्यावी व उपाययोजना काय कराव्यात यावरही भर दिला जाणार असल्याचे प्राथामिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डाॅ.नितीन मोरे यांनी सांगितले.
गेल्या दिडवर्षापासून कोरोना विषाणूची दहशत संपूर्ण जिल्ह्यात पसरली होती.काहि महिन्या
पासून तालुक्यात कोरोनाचा संसर्ग कमी झाला आहे.त्यामुळे कोरोना काळात नागरिकांकडून घेण्यात येत असलेली दक्षता आता कमी प्रमाणात घेण्यात येत आहे.कोरोनाच्या त्या काळात नागरीक साध्या आजाराला सुध्दा रूग्णालयात उपचार घेण्यासाठी जायचे टाळत होते.परंतु आताही नागरीकांनी काळजी घेणे गरजेचे असून,कोरोना सोबतच साथीच्या आजाराचे पण संकट आपल्यासमोर आहे,त्यामध्ये डेंगू मलेरिया चिकनगुनिया यासारखे आजार पसरण्याचा धोका जास्त आहे.हे आजार डासांची उत्पत्ती पासून होतात.आणि पावसाळ्यामध्ये पाणी असलेल्या ठिकाणी डासांची उत्पत्ती होऊन डेंग्यू मलेरियाचा धोका वाढण्याचा धोका जास्त आहे.पुढील पंधरा दिवस टाकळसिंग प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत सर्व गावांमध्ये सात रूप प्रतिबंधात्मक सर्वेक्षण करण्यात येणार आहे त्यामध्ये कंटेनर सर्वेक्षण,पाणी नमुने तपासणीसाठी पाठवणे, तसेच सर्व प्रतिबंधात्मक उपाय योजना राबविण्याबाबत कर्मचाऱ्यांना आदेशित करण्यात आलेले आहे.आणि त्याचबरोबर लोकांमध्ये साथीच्या आजाराबाबत जनजागृती करण्याच्या सुचनाही आरोग्य कर्मचाऱ्यांना देण्यात आल्या आहेत.
()
————
पावसाळ्यामध्ये नागरिकांनी घरामध्ये एकाच ठिकाणी जास्त काळ पाणी साचून डासांची उत्पत्ती होणार नाही याची काळजी घ्यावी,तसेच पावसाळ्यामध्ये पाणी गरम करून प्यावे,आणि घराच्या आजूबाजूला पण कुठेही नाली मध्ये पाणी तुंबणार नाही,पाण्याच्या साठ्यामध्ये उदाहरणार्थ टाकी,हाऊद,याठिकाणी पाणी जास्त काळ ठेवू नये,त्याचबरोबर आठवड्यातून एक दिवस कोरडा दिवस पाळून साथ रोगाला दूर ठेवावे.
————————————————————
—————
आष्टी-टाकळसिंग प्राथामिक आरोग्य केंद्रांअंतर्गत घरोघरी जाऊन साथ रोगाचे सर्वेक्षण मोहिम राबवितांना आरोग्य कर्मचारी दिसत आहेत.
stay connected