*भरदिवसा चोरांचा सुळसुळाट एकाच दिवशी दोन मोटारकारबाईक गेल्या चोरीला*
सुलेमान देवळा(वार्ताहर)
आष्टी तालुक्यातील म्हसोबावाडी येथे श्री. शरद छगन गायकवाड(सर ) हे आपल्या शेतात काम करत असताना रोडवर बाजुला झाडाखाली लावलेली त्यांची मोटरबाईक MH-08 AA. 3956
ही हिरो होंडा कंपनीची गाडी चक्क भरदिवसा चोरांनी चोरी करुन नेली
व रामगुडे बाबासाहेब
शिंदे पोल्ट्री फार्म आंबेवाडी यांची ही MH. 23 L6893 पहाटे 3.00 वाजता शेडमधून मोटरबाईक चोरी गेली
या दुहेरी घटनेने म्हसोबावाडी आंबेवाडी व परिसरात चोरांच्या अशा प्रकारामुळे एक भीतीचे वातावरण निर्माण झाले असुन याबाबत जवळील अंभोरा पोलीस ठाण्यात अज्ञात गुन्हेगार विरुद्धात केस दाखल केली आहे पोलीस ठाण्या(गृहखात्या) अतंर्गत गावोगावी बसवण्यात आलेले सी सी टी व्ही कॅमेरे असुन आडचण नसुन खोळंबा असे झाले कॅमेरा चालु तर असतात कायम परंतु ते छायाचित्र अस्पष्ट येत असल्याने गुन्हेगार अदृश्य होतो तरी पोलीस कर्मचाऱ्यांनी अशा कृती करणाऱ्यांना गजाआड करावं गुन्हेगारीला आळा बसावा अशी ग्रामस्थांकडुन मागणी होत आहे.
stay connected