वाघोलीच्या कुरणवस्ती शाळेत व्रुक्षलागवड ?
( सुनिल नजन /अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी)
अहमदनगर जिल्ह्यातील शेवगाव तालुक्यातील वाघोलीच्या कुरणवस्तीतील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून व्रुक्षलागवड करण्यात आली. या कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी सुंदरराव आल्हाट हे होते. ग्रामपंचायत सदस्य भरत आल्हाट यांनी प्रास्ताविकात व्रुक्षसंवर्धन ही काळाची गरज आहे.आज प्रत्येकाने एकतरी झाड लाउन त्याचे चांगल्याप्रकारे संवर्धन करून पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी विशेष प्रयत्न केले पाहिजे असे मत व्यक्त केले. ह.भ.प.दादासाहेब महाराज आल्हाट यांच्या हस्ते आणि शाळेतील सर्व शिक्षक व्रुंदाच्या उपस्थितीत हा सोहळा संपन्न झाला. यावेळी मुख्याध्यापक सुपेकर सर,प्रतिभा आल्हाट मँडम, प्रा.शरद आल्हाट यांनी आपले विचार व्यक्त केले. याप्रसंगी प्रमोद आल्हाट, संदीप आल्हाट, अरुण आल्हाट, किशोर सरोदे, मार्कस आल्हाट, भगवान आल्हाट, सुरेश आल्हाट, दिपक जाधव,आशिष आल्हाट, किरण बोरुडे, किशोर बोरुडे, भैय्या कळकुटे,शुभम आल्हाट, विश्वास आल्हाट,सौरभ आल्हाट, देवराम वाघमारे,निखिल आल्हाट ,किशोर आल्हाट, अमित आल्हाट यांच्या सह पंचक्रोशीतील अनेक ग्रामस्थ उपस्थित होते.
stay connected