*टायगर ग्रुप चे अध्यक्ष समाजरत्न पुरस्कार,2021 ने सन्मानित__*
पुणे येथे झालेल्या समाजरत्न पुरस्कार 2021 ह्या सोहळ्यात, टायगर ग्रुप महाराष्ट्र राज्याच्या वतीने सतत समाज उपयोगी होत असलेल्या कार्याची दखल घेऊन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ व्यवस्थापन परिषद सदस्य श्री राजेश जी पांडे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून महाराष्ट्रातील पूरग्रस्त भागात चांगले काम करणाऱ्या शिलेदारांचा सन्मान सोहळा आयोजित केला होता. त्यामध्ये टायगर ग्रुप महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष मा.श्री.डॉ.तानाजी भाऊ जाधव यांना समाजरत्न पुरस्कार 2021 ने सन्मानित करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष कुलगुरू सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ प्राध्यापक डॉ.करमळकर सर,
मा श्री मुरलीधर मोहोळ.महापौर पुणे मनपा,मा श्री अनंत ताकवले (IPS,) क्षत्रिय पासपोर्ट अधिकारी,मा श्री रामदास फुटाणे, चित्रपट दिग्दर्शक आणि ज्येष्ठ कवी, समाजसेवक श्री.राज देशमुख साहेब,उद्योजक श्री.पराग मामा मते, चित्रपट दिग्दर्शक जेष्ठ कवी,श्री राजेश जी पांडे सर,व्यवस्थापन परिषद सदस्य सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ तसेच
कवी नारायण पुरी, कवी बंडा जोशी, कवी भरत दौंडकर इ मान्यवर उपस्थित होते__
stay connected