*राम गोसावी गुरुजी यांचे वृद्धापकाळाने निधन*
शेवंगाव - येथील सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षक श्री.राम दादाबा गोसावी (वय ७८) यांचे नुकतेच वृद्धापकाळाने निधन झाले असुन त्यांच्या पश्चात पत्नी,दोन मुले,विवाहित मुलगी,नातवंडे असा परिवार आहे.
शब्दगंध साहित्यिक परिषदेचे संस्थापक सुनील गोसावी, व्यावसायिक अनिल गोसावी व वोरिअर्स फौंडेशन च्या सचिव सौ.संगीता गिरी यांचे ते वडील आहेत.
प्राथमिक शिक्षक म्हणून त्यांनी नांदेवली, मातोरी ता.शिरूर कासार,खळेगाव ता.गेवराई,जि. बीड व गोळेगाव,घोटन ता.शेवंगाव जि. अहमदनगर येथे सेवा केल्या नंतर ते शेवंगाव येथे स्थाईक झाले होते.
गेवराई येथे प्राथमिक शिक्षकांची पतसंस्था स्थापन करण्यात त्यांचा महत्वाचा सहभाग होता. शिक्षक पतसंस्थाचे ते दहा वर्षे संचालक होते.*कृतार्थ* हे त्यांचे छोटेखानी आत्मचरित्र प्रसिद्ध झालेले असुन त्यांनी जनवन सार्वजनिक वाचनालयाची स्थापना केली होती.अतिशय शांत स्वभावाचे असल्याने त्यांचा मित्रपरिवार मोठा होता. त्यांच्याअंत्यविधी प्रसंगी ऍड.सुभाष लांडे पाटील, डॉ.संजय कळमकर, शेवंगाव नगरपरिषदेचे नगरसेवक कमलेश गांधी,शब्दगंध चे अध्यक्ष राजेंद्र उदागे,दशनाम गोसावी समाज संघटनेचे संदिप गोसावी,जगन्नाथ गोसावी,गोरक्षनाथ गिरी व बबनराव गिरी हे यावेळी उपस्थित होते.
stay connected