परभणी आगाराची सोनपेठ बस सिरसाळा पर्यंत वाढवावी- उपसभापती जानिमियाँ कुरेशी यांची निवेदनाद्वारे मागणी

 परभणी आगाराची सोनपेठ बस सिरसाळा पर्यंत वाढवावी- उपसभापती जानिमियाँ कुरेशी यांची निवेदनाद्वारे मागणी




परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- परळी तालुक्यातील सिरसाळा येथे परभणी आगाराची सोनपेठ बस सिरसाळा पर्यंत वाढवावी अशी मागणी पंचायत समितीचे उपसभापती जानिमियाँ कुरेशी यांनी रा.प.म.विभाग नियंत्रक परभणी यांना निवेदनाद्वारे केले आहे.

              सिरसाळा हे सर्वात मोठे गाव आहे. तसेच याठिकाणी पालकमंत्री ना. धनंजय मुंडे यांनी नुकतीच एमआयडीसी मंजूर करण्यात आली आहे. तसेच सिरसाळा बाजार पेठशी आजुबाजुच्या चाळीस गावांचा थेट संपर्क आहे. सिरसाळा तालुक्यात मोठे गाव म्हणूनही ओळखली जाते.  यामुळे सिरसाळा गावाशी दोन जिल्ह्यांचा संपर्क म्हणून परभणी आगाराची परभणी ते सोनपेठ ही बस सेवा सिरसाळा पर्यंत वाढवल्यास दोन जिल्हातील नागरिकांना जाण्यास येण्यास सोय होईल.त्यामुळे  सिरसाळा व सोनपेठ या दोन दोन तालुक्यातील वीस ते पंचवीस गावच्या नागरिकांना या बसमुळे सोय होणार आहे. परभणी आगाराची बस सिरसाळा पर्यंत वाढवावी अशी मागणी नागरिकांमधून होत आहे. शिरसाळा सोनपेठ परभणी बस सेवा सुरू केली तर शिरसाळा व सोनपेठ रोडवरील व सिरसाळा परिसरातील सर्व गावांना या बसा फायदा होईल. तरी बीड जिल्ह्यातील परळी तालुक्यातील सिरसाळा पर्यंत वाढवावी अशी मागणी राज्याचे सामाजिक न्याय मंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा बीड जिल्ह्यातील पालकमंत्री ना. धनंजय मुंडे  व न.प.गटनेते वाल्मिक आण्णा कराड यांच्या मार्गदर्शनाखाली पंचायत समितीचे उपसभापती जानिमियाँ कुरेशी यांनी केली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.