करमाळा शहर व तालुक्यातुन महीला व तरूण मुलींचे पळुन जाण्याचे सत्र थांबेना.
सय्यद राजू करमाळा प्रतिनिधी -
करमाळा शहर व तालुक्यातुन महीला व तरूण मुलींचे पळुन जाण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे.याबाबत पोलिसात गुन्हे दाखल होण्याचे प्रमाण वाढले आहे.
काल दि.17 ऑगस्ट 2021 रोजी करमाळा शहरातील एका महिलेने करमाळा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे की त्यांची सर्वात मोठी मुलगी यशवंतराव चव्हाण महाविद्यालयात शिक्षण घेत आहे सध्या कोरोना काळामुळे महाविद्यालय बंद आहे. माझ्या मुलीचे वय 17 वर्ष 7महिने व 15 दिवस आहे.आम्ही सर्वजण 16 ऑगस्ट रोजी रात्री 11 वाजता झोपलो असता पहाटे 4 वाजता ऊठलो तर माझी मोठी मुलगी घरात नव्हती सगळीकडे शोधाशोध केली व नातेवाईकांना विचारले तरीपण मुलगी काही सापडली नाही त्यामुळे तिला कोणी तरी फुस लावुन पळवली आहे.एवढेच नाहीतर घराजवळील एक युवकही बेपत्ता असल्याचे त्या महीलेने म्हटले आहे .या प्रकरणी करमाळा पोलीसात गुन्हा दाखल असून पुढील तपास करमाळा पोलीस करत आहे.
stay connected