*कडा येथील गांधी हॉस्पिटल चे संचालक डॉ.उमेश गांधी यांच्याकडून नवजीवन बालगृहातील मुलांसाठी 20 कपड्याच्या ड्रेस ची मदत......*
==============================================
आष्टी तालुक्यात माऊली सामाजिक सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून सुरू असलेल्या सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, आरोग्य, शेती विषयक उपक्रमाबरोबरच संस्थेच्या माध्यमातून भटके विमुक्त, आदिवासी, ऊस तोड मजूर, वीट भट्टी कामगार, वंचित व दुर्लक्षित घटकातील गोरगरिबांच्या मुलांच्या शिक्षणासाठी सुरू केलेल्या नवजीवन बालगृहातील मुलांना 20 कपड्याच्या ड्रेस ची मदत कडा येथील सुप्रसिध्द डॉ.उमेश गांधी यांच्याकडून करण्यात आली.
यावेळी संस्थाध्यक्ष विकास म्हस्के यांनी संस्थेच्या माध्यमातून सुरू असलेल्या विविध उपक्रमांची माहिती देत जागतिक पातळीवर कोरोना या भयानक महामारीने हाहाकार घातला असल्याने संस्थेची आर्थिक अडचणी येत असल्याचे सांगत संस्थेने नव्याने सुरू केलेल्या नवजीवन बालगृहातील गोरगरीब मुलांना कपड्याची गरज असल्याने डॉ.उमेश गांधी यांनी 20 मुलांना ड्रेस देऊन मदत केली.
त्यांनी दिलेल्या अनमोल मदतीबद्दल माऊली सामाजिक सेवाभावी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मेजर विकास म्हस्के यांनी समाजातील आपल्यासारखे दानशूर व्यक्ती च्या माध्यमातून हे समाज कार्य चालते असे म्हणून सर्व हॉस्पिटलच्या डॉक्टर व कर्मचारी यांचे आभार मानले.
stay connected