*पाऊसाअभावी जोमात आलेली पिके गेली कोमात..!*
दौलावडगाव प्रतिनिधी...
दौलावडगाव व आष्टी तालुक्यातील जवळपास सर्वच गावात गेल्या महिनाभरापासुन पावसाने दांडी मारल्याने पिके धोक्यात आली. यंदा मिरूग नक्षञाचा पाऊस वेळेवर पडल्यामुळे पिके खुप जोमात आली होती परंतु गेल्या महिन्यापासुन पाऊस न पडल्याने जोमात आलेले पिके गेली कोमात..! उडीद ,सोयाबीन, मुग ,बाजरी, मका इत्यादी पिकांना पाण्याची खुपचं आवश्यकता आसून काही ठिकाणी पिकांनी माना टाकल्या तर काही करूपु लागले. शेतकरी रोज आशेने आकाशाकडे बघू लागला. आज न उद्या पाऊस येईल या अशेने जगत आहे . येत्या दोन-चार दिवसात पाऊस झाला नाही तर ओठा तोंडात आलेला घास वाया जाऊन याचा शेतकऱ्यांला खूप मोठा फटका बसू शकतो आणि शेतकरी पुन्हा एकदा अडचणीत आलेला दिसुन येईल यात शंका नाही.आज पर्यंत जो शेतकरी जगाचा पोशिंदा म्हणुन ओळखला जातो त्याच्यावरच उपासमारीची वेळ आल्याशिवाय राहणार नाही.पिके करपू लागल्याने शेतकरी हतबल झाला आहे व त्याला आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे.यातून सावरन्यासाठी सरकारने अर्थिक मद्दत करावी अशी जनतेतून होत आहे मागणी.
stay connected